शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मदतीसाठी एक हजार फोन; १०० नंबर हेल्पलाइन ठरली उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:51 IST

लॉकडाऊन, चक्रीवादळात पोलिसांचे सहकार्य

- निखिल म्हात्रेअलिबाग : लॉकडाऊन असो वा निसर्ग चक्रीवादळ जिल्ह्यातील नागरिकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाचे दार न ठोठावता, रायगड पोलीस विभागाच्या नियंत्रण कक्षात एक हजार जणांनी मदत मागितली होती. रायगड पोलिसांनी पीडित नागरिकांच्या भावना समजून घेत, त्यांना मदतीचा हात पुढे केला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आत्मीयता निर्माण झाली आहे.

आपत्तीत सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीने १०० नंबर या हेल्पलाइनवरून संपर्क साधताच, नियंत्रण कक्ष माहिती दिल्यानंतर, पोलीस यंत्रणा कार्यान्वित होते. या हेल्पलाइनवर नैसर्गिक आपत्ती, आग, दंगल, भूकंप, चोऱ्या, ध्वनिप्रदूषण, स्त्रियांची छेडछाड, कौटुंबिक भांडणतंटे अशा कारणांसाठी संपर्क साधून मदत मागता येते. आपत्कालीन परिस्थितीत मदतीला तत्काळ धावून जाणारी ही हेल्पलाइन खूप उपयुक्त सिद्ध होत आहे. याचा प्रत्यय रायगडमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊन व निसर्ग चक्रीवादळानंतर दिसून आला.

सर्वप्रथम संकटात सापलेल्या व्यक्तीला स्थळ विचारून आपत्तीचे स्वरूप जाणून घेतले जाते आणि त्यावरून मदत दिली जाते. त्यानंतर, वायरलेसचे कर्मचारी बीट मार्शल अथवा दामिनी पथकाला कॉल देतात. प्रत्येक पोलीस ठाण्याला बीट मार्शल व दामिनी पथक कार्यरत असतात. स्थळ कळताच, जवळचे बीट मार्शल तातडीने मदतीसाठी धावून जातात. संकटात असणाºयास पोलीस व्हॅन्स, बिनतारी यंत्रणा सुसज्ज असते. त्यामुळे १०० नंबरच्या या हेल्पलाइनवर फोन करताच, पुढील पाच ते सात मिनिटांत योग्य ती मदत मिळत असल्याचे रायगडच्या जनतेने अनुभवले आहे.

आपले अनुभव सांगताना स.पो.नि कदम सांगतात, ड्युडीवर राहूनही सर्व सामान्य जनतेच्या फोनवरून का होईना, पण त्यांच्या अडचणीच्या काळात माझ्याकडून मदत झाली हे माझे पुण्य समजतो. त्यांच्या विविध प्रश्नांचे निराकारण करणे आमचे प्रथम काम समजतो. सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे आपला अनुभव सांगताना म्हणाले, लॉकडाऊन काळात नागरिकांचे अनेक कॉल आले. यामध्ये प्रामुख्याने अन्न-धान्य नाही, नोकरी गेली आहे, त्यामुळे आम्ही मदतीच्या प्रतीक्षेत आहोत, असे एक ना अनेक फोन येत होते. त्यांची सध्याची परिस्थिती ऐकूनमन गंभीरही होत होते. मात्र, त्यांना समजावून सांगत, यातून कसे बाहेर पडता येईल, हे सांगण्याचा प्रयत्न करीत होतो.काहींनी आम्ही सांगितलेले उपाय आजमावत त्यांना यश मिळाल्यावर, पुन्हा १०० नंबरवर फोन करून आभार मानले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

७७१ कॉल माहिती घेण्यासाठी आले - आर.सी.कदम

च्लॉकडाऊन व चक्रीवादळादरम्यान रायगड जिल्ह्यातील एक हजार नागरिकांनी मदतीकरिता पोलिसांच्या १०० नंबरवर संपर्क करून आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यापैकी ७७१ कॉल हे माहिती घेण्याकरिता केले होते, तर ८० कॉल हे मदत हवी असल्याचे सांगण्यासाठी करण्यात आले होते.

च्१४९ कॉल हे असेच चाचपणीसाठी आले होते. मदतीसाठी आलेले कॉल हे वादळामुळे घराचे नुकसान झाले, घराचे पत्रे उडाले, वादळामुळे गावातील नागरिकांशी संपर्क होऊ शकला नाही, वीजवाहिन्या तुटल्याने लाइट आलेला नाही, रस्त्यात झाड तुटली असल्याने रस्ते बंद झाले असल्याचे कॉल होते. च्त्यांच्या समस्या जाणून घेत, नागरिकांना कशा प्रकारे मदत पोहोचविता येईल, यासाठीरायगड पोलीस दलाने प्रयत्न केले असल्याचे कंट्रोल ड्युटीवर असलेले अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आर.सी. कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

वादळाच्या दिवशी कुटुंबाशी संपकर् ासाठी फोन : निसर्ग चक्रीवादळाच्या दिवशी ड्युटीवर असलेले सहायक पंोलीस निरीक्षक राहुल अतिगरे आपले अनुभव सांगताना म्हणाले, १२.४५ला वादळ सुरू झाले, ते साधारण पुढील दोन तास सुरू होते. वादळ संपताच फोनची कनेक्टिव्हिटी गेली होती. नक्की कोण कुठे आहे, याचा थांगपत्ता नागरिकांना नव्हता, अशा वेळी बºयाच ठिकाणांहून कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचे फोन आले होते. फोन केलेल्या व्यक्तीचे नाव, त्याचा पत्ता संपर्क होत नसलेल्या व्यक्तीचे नाव, त्याचा पत्ता असे सर्व घेऊन संबंधितांचा संपर्क साधून देत होतो. या दरम्यान, ग्रामीण भागात हाताच्या बोटावर कमावून ठेवलेले वादळात सर्व वाहून गेल्यावर पुन्हा ताठ कण्याने उभ्या राहणाºया नागरिकांना पाहायला मिळाले असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’शी राहुल अतिगरे यांनी व्यक्त के ली.

टॅग्स :alibaugअलिबागNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस