शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराला मिळेल गती; सिडकोला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 04:42 IST

विमानतळ प्रकल्पबाधित ग्रामस्थांचा बैठकीत सकारात्मक प्रतिसाद

नवी मुंबई : गणेशोत्सवानंतर विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराला गती मिळेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी ग्रामस्थांबरोबर बैठक झाली. यात ग्रामस्थांनी स्थलांतराला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले.विमानतळबाधित दहा गावांतील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, करंजाडे व वरचा ओवळा येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या दहा गावांतील ३००० कुटुंबे पर्यायी जागेवर स्थलांतरित होणार आहेत. स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांनी सिडकोच्या वतीने भरीव पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहेत. त्यानंतरही काही मागण्यांवर ग्रामस्थ ठाम आहेत. त्याचा परिणाम म्हणून स्थलांतरणाच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. स्थलांतरासाठी ७ जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत केवळ १७०० ग्रामस्थांनी स्थलांतरण केले आहे. उर्वरित १३०० ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरण करून आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीत सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. १५ दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ग्रामस्थांबरोबर पुन्हा बैठक घेऊन गणेशोत्सवानंतर स्थलांतरण करण्याचे आवाहन केले.दहा गावांपैकी पाच गावांतील ग्रामस्थांकडून स्थलांतराला प्रतिसाद मिळत आहे; परंतु उर्वरित पाच गावांतील ग्रामस्थ काही मागण्यांवर अडून बसले आहेत; परंतु त्यांच्याबरोबर समाधानकारक चर्चा झाली असून, गणेशोत्सवानंतर स्थलांतराच्या प्रक्रियेला वेग मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे.पुनर्वसनाच्या ठिकाणी अद्याप पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. शाळा, हॉस्पिटल्स, तसेच पाणी या अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वप्रथम या सुविधा द्या, मगच स्थलांतर करू, असा पवित्रा वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. वरचा ओवळा हे गाव धावपट्टीच्या मुख्य गाभा क्षेत्रात असल्याने सर्वप्रथम या गावाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानंतर येथील ग्रामस्थ नक्कीच स्थलांतर करतील, असा विश्वास सिडकोला वाटत आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको