शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
3
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
4
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
5
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
6
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
7
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
8
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
9
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
10
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
11
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
12
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
13
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
14
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
15
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
16
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
17
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
18
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
19
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
20
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...

ठाण्यात ‘ही’ कंपनी ६० हेक्टरवर उभारणार बुलेट ट्रेनचा डेपो; ५.५ वर्षांत बांधकाम पूर्ण होणार?

By नारायण जाधव | Published: December 28, 2023 7:27 AM

स्पर्धक कंपन्यांपेक्षा निम्म्या दराची ९४५ कोटींची निविदा मंजूर.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई ( Marathi News ): मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा राज्यातील एकमेव असलेला देखभाल-दुरुस्ती डेपो बांधण्याचे कंत्राट अखेर दिनेशचंद्र आर अगरवाल आणि दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन यांनी संयुक्त भागीदारीत जिंकले आहे. त्यांची सर्वात कमी दराची ९४५ कोटींची निविदा नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने मान्य केली आहे. येत्या साडेपाच वर्षांत या डेपोचे बांधकाम पूर्ण करण्याची अट आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीनजीकच्या भारोडी आणि अंजूर गावाच्या हद्दीतील तब्बल ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो बांधण्यात येत आहे. यासाठी नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने डिसेंबर २०२२ मध्ये मागविलेल्या निविदांना चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. ज्या चार कंपन्यांनी हा डेपो बांधण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे, त्यामध्ये दिनेशचंद्र आर अगरवाल-दिल्ली मेट्रो रेल कार्पोरशन, केईसी इंटरनॅशनल, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि एससीसी-प्रेमको यांचा समावेश होता. 

२२ हेक्टरवर ठाणे स्थानक

बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकासाठी २२ हेक्टर जागेचे संपादन केले आहे. यात ठाणे पालिका क्षेत्रातील खासगी मालकीची जमीन १८ हेक्टर ८ आर ८१ चौरस मीटर, मध्य रेल्वेच्या मालकीची ४२ आर ३९ चौरस मीटर, राज्य शासनाच्या दोन हेक्टर ३२ आर १० चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे. यासाठी आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शीळ व देसाई आदी ठिकाणांवरील अतिक्रमणे काढली आहेत.  त्यामुळे येथील डेपोच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

डेपो बांधण्यासाठी स्पर्धेत उतरलेल्या कंपन्यांच्या निविदांची तांत्रिक मूल्यमापन तपासणीनंतर सर्वांत कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. जी दिनेशचंद्र आर अगरवाल-दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरशनची ९४५ कोटींची हाेती. तर लार्सन अँड टुब्रोने १५७० कोटी आणि  एससीसी-प्रेमको यांनी २१०० कोटींची निविदा भरली होती. नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने मान्य केलेली निविदा आणि इतर स्पर्धकांनी लावलेल्या बोलीत जवळपास दुप्पट फरक आहे. एल अ‍ॅण्ड टी सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीनेही १५७० कोटींची निविदा भरली होती. यामुळे डेपोच्या बांधकामांचा दर्जा कसा राहील,  याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

डेपोत या कामांचा असणार समावेश

- कामाच्या व्याप्तीमध्ये ठाणे डेपोची रचना आणि बांधकाम समाविष्ट आहे, ज्यामध्ये रस्ते, गटारे, इमारतींचे बांधकाम, तपासणी शेड, गाड्यांची दैनंदिन तपासणी, त्या धुण्यासाठी जलाशयांची निर्मिती करण्यात येणार आहे. 

- याशिवाय जपान येथून मागविलेली ८०० हून अधिक उपकरणे बसवून त्यांची प्रत्यक्षात तपासणी करून रीतसर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यावर बुलेट ट्रेनची सुरक्षितता अवलंबून आहे. त्यानंतरच हा डेपो कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

- प्रकाश देखभालीच्या कामासाठी या डेपोमध्ये सुरुवातीला ४ इन्स्पेक्शन लाईन्स (भविष्यात ८), १० स्टॅबलिंग लाईन्स (भविष्यात ३१), इन्स्पेक्शन बे आणि वॉशिंग प्लांट यांचा समावेश असणार आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन