शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पनवेल मतदारसंघात ‘नोटा’ला तिसरे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:43 AM

पनवेलमधील पाणी, रस्ते समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी

- वैभव गायकरपनवेल : महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. तब्बल पाच लाख ५७ हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात तीन लाख एक हजार ७०२ मतदारांनी मतदान केले. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी मतदान, ५४.१३ टक्के पनवेलमध्ये झाल्याने कोणत्या पक्षाला किती मतदान झाले याबाबत उत्सुकता होती. मात्र, निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून ‘नोटा’ला तिसरे स्थान मिळाले आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात एकूण दहा उमेदवार होते. भाजपचे प्रशांत ठाकूर विरुद्ध शेकापचे हरेश केणी यांच्यात या मतदारसंघात थेट लढत होती. आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली, तर शेकापच्या हरेश केणी यांना ८६ हजार २११ एवढी मते मिळाली. इतर आठ उमेदवारांच्या तुलनेत नोटाला पनवेलकरांनी अधिक पसंती दिल्याने तिसऱ्या क्रमांकाची मते दिली. ‘नोटा’ला १२ हजार ३७१ मते मिळाली आहेत. पनवेलमध्ये नोटा मोहीम सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. विशेषत: खारघर, कामोठे, कळंबोलीसारख्या शहरी भागात नोटाबाबत मोहीम छेडण्यात आली होती. दोन प्रमुख उमेदवारांच्या व्यतिरिक्त ‘नोटा’ची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती.

निवडणुकीला उभे असलेल्या एकही उमेदवाराला पसंती नसेल तर ‘नोटा’ हा पर्याय निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करून दिलेला आहे. पनवेलमधील १२ हजार ३७१ मतदार दहा उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. पनवेल विधानसभा मतदारसंघात हरेश केणी यांचे नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार हरेश केणी यांना ८,७९२ मते मिळाली आहेत. पनवेल मतदारसंघ ‘नो सर्व्हिस, नो व्होट’ या मोहिमेनेही गाजले होते.

नवी मुंबईत ९००५ मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती

केवळ ‘नोटा’चे बटण दाबण्यासाठी १२,३७१ मतदार घराबाहेर पडलेनिवडणुकीतील उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्यास निवडणूक आयोगाने ‘नोटा’ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पनवेलमध्ये दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यापैकी एकही उमेदवार १२ हजार ३७१ मतदारांनी पसंत नसल्याने केवळ ‘नोटा’ दाबण्यासाठी १२ हजार ३७१ मतदार मतदानाच्या दिवशी घराबाहेर मतदानासाठी बाहेर पडल्याचे अंतिम निकालावरून दिसून येत आहे. 

राजकारणात निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेमुळे मतदारांचा कल ‘नोटा’कडे वाढताना दिसत आहे. याचा परिणाम म्हणून या वेळी विधानसभा निवडणुकीत नोटाचा प्रभावी वापर झाल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून तब्बल ९,००५ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. तर शेजारच्या उरण मतदारसंघात ३,०७२ मतदारांनी नोटावर शिक्का मारला आहे. नवी मुंबईतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषत: प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न मागील २० वर्षांपासून जैसे थे आहे.

सिडको निर्मित इमारतींची पुनर्बांधणीही रखडली आहे. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आणि मागील पाच वर्षे भाजप-सेना युतीने हे प्रश्न केवळ चर्चेपुरतेच मर्यादित ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांसह सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाºया रहिवाशांत सत्ताधाऱ्यांविषयी चिड निर्माण झाली आहे.

त्याशिवाय मागील अनेक वर्षांपासून याच प्रश्नांवर नागरिकांना झुलवत ठेवणारे नेतेच या वेळीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवाय, त्यांच्यासमोर दुसरा कोणताही सक्षम पर्याय नसल्याने अनेकांनी नोटाला पसंती दिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, आगरी-कोळी यूथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेनेही निवडणुकीच्या तोंडावर नोटा चळवळ सुरू केली होती. गावोगावी बैठका घेऊन नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. या सर्वाचा परिणाम म्हणून ऐरोली मतदारसंघातून ५,२०१ तर बेलापूरमधून ३,८०४ मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचे समोर आले आहे. उरण मतदार संघातही नोटाला अधिक पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी ३,०७२ मतदारांनी नोटावर शिक्का मारला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019panvel-acपनवेल