दिघा अतिक्रमण प्रकरणी तिसरा गुन्हा

By Admin | Updated: October 20, 2015 23:53 IST2015-10-20T23:53:47+5:302015-10-20T23:53:47+5:30

दिघा परिसरात अनधिकृतपणे इमारती बांधणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पांडुरंग अपार्टमेंट प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण तीन प्रकरणांमध्ये

Third offense in the case of encroachment in Digha | दिघा अतिक्रमण प्रकरणी तिसरा गुन्हा

दिघा अतिक्रमण प्रकरणी तिसरा गुन्हा

नवी मुंबई : दिघा परिसरात अनधिकृतपणे इमारती बांधणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पांडुरंग अपार्टमेंट प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण तीन प्रकरणांमध्ये १० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सिडको व एमआयडीसीच्या जमिनींवर तब्बल ९९ इमारती बांधण्यात आल्या आहेत. खोटी कागदपत्रे तयार करून या इमारतींमधील घरे सामान्य नागरिकांना विकण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाने या इमारती पाडण्याचे व बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पांडुरंग अपार्टमेंट इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर रमेश खारकर व किशोर कोळी या दोघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे दाखल होवू लागल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Third offense in the case of encroachment in Digha