कळंबोली आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण; रुग्ण पूर्णपणे बरा असल्याची माहिती
By वैभव गायकर | Updated: December 26, 2023 15:13 IST2023-12-26T15:13:04+5:302023-12-26T15:13:18+5:30
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. यापूर्वी खारघर शहरात दोन रुग्ण आढळले होते.

कळंबोली आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण; रुग्ण पूर्णपणे बरा असल्याची माहिती
पनवेल: पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. यापूर्वी खारघर शहरात दोन रुग्ण आढळले होते. ते दोन्हीही रुग्ण बरे झाले असून तिसरा रुग्ण कळंबोली येथील एकता सोसायटीतील असून हा रुग्ण पूर्णपणे बरा असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.
नव्याने कोरोनाचा एन1 व्हेरिएंट चर्चेत आल्याने शासनाचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवले असून अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती डॉ गोसावी यांनी दिली. दरम्यान नव्याने आढललेल्या रुग्णांना कोणतीही वेगळी लक्षणे नसून सर्वच रुग्णांनी घरीच उपचार घेतला. कळंबोली मधील 32 वर्षीय पुरुष रुग्णांची तब्बेत देखील व्यवस्थित असल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले.