लैंगिक अत्याचार प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:31 IST2018-06-19T02:31:14+5:302018-06-19T02:31:14+5:30
कळंबोली येथील ग्यान आश्रमातील तीन भावांवर त्याच आश्रमात राहणा-या तिघा तरु णांनी लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

लैंगिक अत्याचार प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक
पनवेल : कळंबोली येथील ग्यान आश्रमातील तीन भावांवर त्याच आश्रमात राहणा-या तिघा तरु णांनी लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. कळंबोली पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. तिसºया आरोपीचा कळंबोली पोलीस शोध घेत होते. तिसºया अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.
कळंबोली येथील ग्यान आश्रमातील तिघा भावंडांवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्र ार करण्यात आली होती. या पीडित भावंडांमध्ये दोघे अल्पवयीन आहेत. या आरोपींनी मिळून गेल्या ३ महिन्यांपासून आपल्यावर अत्याचार केले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. कळंबोली पोलिसांनी यातील दोघा आरोपींना अटक केली होती, तर तिसºया अल्पवयीन आरोपीला देखील अटक केली असून त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.