उलगडली ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’

By Admin | Updated: November 8, 2014 22:27 IST2014-11-08T22:27:51+5:302014-11-08T22:27:51+5:30

रायगडमधील तळा-महाडच्या निसर्ग रमणीय परिसरात या चित्रपटाचे चित्रिकरणत करण्यात आले आहे.

The 'thing her love' | उलगडली ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’

उलगडली ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’

जयंत धुळप - अलिबाग
रायगडच्या मातीतलेच लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक नरेंद्र ठाकूर, सहनिर्माते डॉ. चांदोरकर, सहदिग्दर्शक जितेंद्र म्हात्रे, संगीतकार विक्रांत वार्डे, नायिका वैशाली चांदोरकर, कवी व गीतकार मनिष अनसुरकर व रमेश धनावडे नायक भूषण प्रधान आणि गायिका आर्या आंबेकर, कॅमेरामन राजा डगडतरे यांच्या अथक परिश्रमातून चित्रीत करण्यात आलेल्या गोष्टी तिच्या प्रेमाची या चित्रपटाचा शुभारंभ शुक्रवारी झाला. 
रायगडमधील तळा-महाडच्या निसर्ग रमणीय परिसरात या चित्रपटाचे चित्रिकरणत करण्यात आले आहे. 
चित्रपटाचा प्रिमीयर शो अलिबागमधील सुवर्ण महोत्सवी ब्रम्हा चित्रपट गृहात चित्रपटगृहाचे मालक व कोकणातील चित्रपटगृहांची मुहूर्तमेढ रोवणारे गजेद्र तथा गजुशेठ दळी यांच्या हस्ते झाला आणि रायगडमधल्या या गुणी कलाकांरांच्या अथक कलेचीच गोष्ट रसिकप्रेक्षकांसमोर उलगडली गेली.
यावेळी अलिबागच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेवीका नमीता नाईक, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या गुणी कलाकारांचे कौतूक करुन शाब्बासकी देण्याकरीता उपस्थित होत. प्रत्येक क्षेत्नात स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणो गरजेचे आहे. त्यामुळेच त्यांच्यातील सुप्त गुण लोकांपर्यंत पोहोचणो शक्य होऊ शकेल. चित्नपट क्षेत्नात काम करणो सोपे नसून यामागे भरपूर लोकांची मेहनत व परिश्रम असतात. रायगड जिल्ह्यात चित्रित झालेल्या या चित्नपटामुळे राज्यातील पर्यटकांना रायगडच्या सौंदयार्ची ओळख होवू शकेल असे प्रतिपादन चित्रलेखा पाटील यांनी यावेऴी बोलताना केले.
 
गोष्ट तिच्या प्रेमाची या रायगड जिल्ह्यात तयार झालेल्या चित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी चित्रपटगृहांची मुहूर्तमेढ रोवणारे गजेंद्र दळी, नगरसेविका नमिता नाईक, पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, नरेंद्र ठाकूर, सहनिर्माते  चांदोरकर आदी. 
 

 

Web Title: The 'thing her love'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.