पनवेल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ;एका रात्रीत १२ दुकाने फोडली

By वैभव गायकर | Updated: October 13, 2023 09:36 IST2023-10-13T09:35:31+5:302023-10-13T09:36:02+5:30

पनवेल शहरात गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका रात्रीत शहरातील १२ दुकाने फोडून लाखों रुपये लंपास केल्यास अंदाज आहे.

Thieves' rampage in Panvel city; 12 shops were broken into in one night | पनवेल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ;एका रात्रीत १२ दुकाने फोडली

पनवेल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ;एका रात्रीत १२ दुकाने फोडली

वैभव गायकर

पनवेल: पनवेल शहरात गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका रात्रीत शहरातील १२ दुकाने फोडून लाखों रुपये लंपास केल्यास अंदाज आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहरातील नगर पालिका कॉप्लेक्स मध्ये ही चोरी करण्यात आली आहे. याठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये देखील चोरटे कैद्य झाले आहेत. याच घटनेच्या अंतरावर पोलीस चौकी देखील आहे, मात्र त्या चौकीजवळील दुकानात देखील चोरटयांनी आपला हात साप केल्याचे पहावयास मिळत आहे.

दुकानाचे शटर रॉडने तोडून चोरटयांनी दुकानात प्रवेश केला. शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एकाच वेळी १२ दुकाने फोडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचे मात्र धिंडवडे निघालेले पहावयास मिळत आहेत.

Web Title: Thieves' rampage in Panvel city; 12 shops were broken into in one night