शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी अडचणीत,सरपंचासह सदस्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:47 IST

कामोठे ग्रामपंचायतीत त्यावेळी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश निर्गमित केले होते.

कळंबोली : कामोठे ग्रामपंचायतीत त्यावेळी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश निर्गमित केले होते. चौकशीमध्ये त्यात बरचशे तथ्य आढळल्याने गटविकास अधिकाºयाने तत्कालीन सरपंच आणि १४ सदस्यांवर सोमवारी फौजदारी गुन्हे दाखल केले. त्यामुळे पनवेलच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.एक लाखापेक्षा जास्त रकमेची खरेदी करायची असल्यास नियमानुसार ई-टेंडर काढणे बंधनकारक आहे. मात्र कामोठे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि त्यांच्या सहकाºयांनी नियम धाब्यावर बसवून खुर्च्यांची खरेदी केली. यासाठी ७ लाख १७ हजार १६२ रूपये खर्च दाखवण्यात आला. तसेच ठेकेदाराने विलंबाने खुर्च्या पुरवठा करूनही त्यांच्याकडून कोणताही दंड आकारला नाही. ४५०० आणि ५००० अशा दोन टप्प्यात खरेदी केलेल्या खुर्च्यांची किंमत वेगवेगळी लावण्यात आली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने खरेदी केलेली व्यायामाचे साहित्य देखील नियमबाह्य खरेदी केल्याचा आरोप चौकशीत सिध्द झाला आहे. याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक निधी लेखा संचालनालयाचे संचालक यांच्या आदेशानुसार विशेष पथक नेमून लेखापरीक्षण करण्यात आले.२०१३ ते २०१५ दरम्यान झालेल्या या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये अनेक ठपके ठेवण्यात आले आहे. ठेकेदाराने खुर्च्या पुरविण्यास विलंब करूनही ग्रामपंचायतीने प्रतिआठवडा ०.५ इतका दंड आकारला नाही. त्यामुळे १ लाख २६ हजार ५६२ रूपयांचे नुकसान झाले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एन. तेटगुरे यांच्या फिर्यादीनुसार ग्रामसेवक प्रकाश चांगा म्हात्रे, तत्कालीन सरपंच बेबी म्हात्रे, उपसरपंच के. के. म्हात्रे, सदस्य शंकर म्हात्रे, राकेश गोवारी, अनंत भगत, सुनील ढेमरे, कमल म्हात्रे, कुसुम म्हात्रे, दिलीप पाटील, प्रदीप भगत, मालती गोवारी, रूपाली गोवारी, अश्विनी चिमणे, जयश्री गोवारी आदी पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.दोघे जण सध्याभाजपाचे नगरसेवकग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाला तेव्हा कामोठे ग्रामपंचायतीत सदस्य असलेले तीन भाजपाचे सदस्य महापालिका झाल्यानंतर नगरसेवक झाले. कुसुम म्हात्रे, दिलीप पाटील, प्रदीप भगत अशी या नगरसेवकांची नावे आहेत.नियम पायदळी तुडवून ग्रामपंचायतीतील सदस्य आणि तत्कालीन सरपंचावर कारवाई झाली पाहिजे, कोणत्याही पक्षाचे असोत ग्रामपंचायतीच्या पैशात गैरव्यवहार झाला हा प्रकार चुकीचा आहे. आमच्या पक्षाचे लोक असले तरी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे.- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल.

टॅग्स :Crimeगुन्हा