गोठणवाडीत चोरी करणाऱ्यास अटक
By Admin | Updated: January 21, 2016 02:40 IST2016-01-21T02:40:59+5:302016-01-21T02:40:59+5:30
रोहा तालुक्यातील कोकबनजवळच्या गोठणवाडी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरात मध्यरात्री घुसून त्यांना मारहाण करत सोन्याची

गोठणवाडीत चोरी करणाऱ्यास अटक
अलिबाग/ रोहा : रोहा तालुक्यातील कोकबनजवळच्या गोठणवाडी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरात मध्यरात्री घुसून त्यांना मारहाण करत सोन्याची चेन लंपास करुन फरार झालेल्या चोरट्याला अवघ्या चार दिवसात पकडण्यात रोहा पोलिसांच्या तपास पथकास यश आले आहे.
१५ जानेवारीच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गोठणवाडी-कोकबन गावातील चांगू पाटील या दापत्याच्या घराची कौले काढून आरोपीने घरात प्रवेश केला होता. त्या दाम्पत्याला दुखापत करुन चांगू पाटील यांच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरुन नेली होती. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.बी. मेश्राम यांनी करुन आरोपीबाबत माहिती मिळवून संयुक्त पथकाने चार दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आहे. अनंत वाघमारे (४०,रा.कोकनबन, आदिवासीवाडी) असे त्याचे नाव असून सध्या अलिबागजवळच्या भाल गावातील नखाते चाळ येथे राहात आहे. त्यास सोमवारी (१८ जानेवारी) ताब्यात घेऊन, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन त्यास अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत सुनावली.