शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या बाजार पेठेत बर्निंग टेम्पोचा थरार, तासाभरासाठी नागरिकांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 18:56 IST

उरण-करंजा नौदलाच्या शस्त्रागाराच्या डेपोमध्ये युपीएसच्या वापरासाठी उपयोगात येणाऱ्या १२० बॅटऱ्या घेऊन पुण्याहून आयशर मिनी ट्रक निघाला होता.

मधुकर ठाकूर -

उरण : उरणच्या बाजार पेठेत आज नागरिकांनी बर्निंग मिनी ट्रकला अचानक लागलेल्या आगीचा थरार अनुभवला. मात्र या गंभीर घटनेमुळे शहरवासीयांमध्ये तासाभरासाठी घबराटीचे वातावरण पसरले होते. उरण-करंजा नौदलाच्या शस्त्रागाराच्या डेपोमध्ये युपीएसच्या वापरासाठी उपयोगात येणाऱ्या १२० बॅटऱ्या घेऊन पुण्याहून आयशर मिनी ट्रक निघाला होता. सकाळी उरण शहरातील राजपाल नाक्यावर आल्यानंतर नागरिकांना गाडीत मागच्या बाजूला आग लागल्याचे दिसून आले. सुज्ञ नागरिकांनी गाडीत काहीतरी जळत असल्याची बाब वाहनचालक संतोष सिताराम पन्हाळकर (२९) रा. पुणे यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र आगीची बाब निदर्शनास येईपर्यंत एव्हाना गाडीत असलेल्या १२० बॅटऱ्यांनी पेट घेतला होता. त्यामुळे मीनी आयशर ट्रकला आगीने वेढले होते.

वाहनचालक संतोष पन्हाळकर यांनी प्रसंगावधान राखून आणि धाडसाने भर बाजारात पेटलेला ट्रक भरधाव वेगाने चालवत अर्धा किमी अंतरावर सुरक्षित आणि वर्दळ नसलेल्या ठिकाणी आणून ठेवला आणि वाहनातून उडी घेऊन सुरक्षितरित्या उतरला. एव्हाना तासाभराच्या पेटत्या मीनी ट्रकच्या थराराची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली होती.माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आयशर मिनी ट्रकला लागलेली आग लागलीच आटोक्यात आणली.यामध्ये मीनी ट्रक आणि त्यामधील नौदलाच्या शस्त्रागार डेपोमध्ये नेण्यात येणाऱ्या १२० बॅटऱ्याही जळून खाक झाल्या आहेत.या घटनेत मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे एपीआय गणेश शिंदे यांनी माहिती देताना सांगितले.नुकसानीचा आकडाही याक्षणी सांगणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान  उरण शहरातील गजबजलेल्या भर बाजारपेठेतून मंगळवारी (२५) सकाळी ९ च्या सुमारास आगीने वेढलेल्या मीनी ट्रकचा थरार शेकडो नागरिकांनी अनुभवला. यावेळी रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र नागरिक व वाहन चालकाच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

टॅग्स :fireआगMarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबई