शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
3
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
4
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
5
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
6
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
8
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
9
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
11
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
12
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
13
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
14
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
15
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
16
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
17
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
18
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
19
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

निलंबित तहसीलदाराकडे तब्बल २.५ कोटींचे घबाड; उत्पन्नापेक्षा आढळली ९८ टक्के जास्त संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 6:40 AM

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दळवी यांच्यावर लाच घेताना कारवाई केली होती. तक्रारदार यांच्याकडे त्यांनी ५ लाखांची लाच मागून त्यापैकी २ लाख रुपये घेतले होते. त्यांच्या घराच्या झडतीत १ कोटी २ लाखांची रोकड, ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने व काही मालमत्तांची माहिती हाती लागली होती. 

नवी मुंबई : अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे उत्पन्नाच्या ९८ टक्के अधिक संपत्ती मिळून आली आहे. लाच मागितल्याप्रकरणी २०२२ मध्ये त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा शोध सुरू होता. त्यामध्ये २ कोटी ६२ लाखांची त्यांची संपत्ती मिळून आली असून, बहुतांश संपत्ती त्यांच्या पतीच्या नावे केली होती. त्यांना ७ दिवसांची कोठडी दिली आहे. 

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दळवी यांच्यावर लाच घेताना कारवाई केली होती. तक्रारदार यांच्याकडे त्यांनी ५ लाखांची लाच मागून त्यापैकी २ लाख रुपये घेतले होते. त्यांच्या घराच्या झडतीत १ कोटी २ लाखांची रोकड, ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने व काही मालमत्तांची माहिती हाती लागली होती. 

५ घरे, १ भूखंड आणि एक गाळा -मालमत्तेच्या अधिक चौकशीत मीनल दळवी यांची तब्बल २ कोटी ६२ लाखांची संपत्ती समोर आली आहे. त्यामध्ये घरातून जप्त केलेल्या ऐवजासोबतच ५ घरे, १ भूखंड व १ व्यावसायिक गाळा अशी मालमत्ता उघड झाली आहे. ही सर्व संपत्ती पती कृष्णा दळवीच्या (वय ५५) नावे केलेली आहे. 

-कृष्णा यांचा टुरिस्ट बुकिंगचा व्यवसाय होता; मात्र त्यातून कोणत्याही प्रकारे नफा नसताना दाखविण्यासाठी तो व्यवसाय चालवला जात होता. 

-यावरून संपूर्ण संपत्ती ही तहसीलदार मीनल दळवी यांनी शासकीय नोकरीला लागल्यापासून कमावल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे. त्यानुसार पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी