शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड प्रकरणी 'रहेजा कॉर्प'कडून २५० कोटी वसुलीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्याने सिडको प्रशासनाला जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:48 IST

सिडकोने २००३ मध्ये ३० हजार चौ.मी. भूखंड प्रति चौ. मी. १०,२५० रुपये या अल्प दराने रहेजाला दिला होता.

-नारायण जाधव, नवी मुंबई वाशी रेल्वे स्थानकासमोरील इनॉर्बिट मॉलसाठी विनानिविदा दिलेल्या भूखंड प्रकरणात मे. के. रहेजा कॉर्पकडून ५१ कोटी रुपयांची मूळ रक्कम १६ डिसेंबर २००३ पासून दंड-व्याजासह वसूल करण्याचा ठराव सिडको संचालक मंडळाने नुकताच मंजूर केला. व्याज व दंड धरल्यास ही रक्कम २०० ते २५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. तब्बल २३ वर्षे नियमबाह्य भूखंडवाटप प्रकरणावर सिडकोकडून चालढकल करण्यात येत होती.

सिडकोने २००३ मध्ये ३० हजार चौ.मी. भूखंड प्रति चौ. मी. १०,२५० रुपये या अल्प दराने रहेजाला दिला होता. त्यामध्ये जापनीज गार्डन बांधण्याची अट होती. त्याचबरोबर इनॉर्बिट मॉललगतची ५००० चौमी जागा कोणतेही मूल्य न घेता विकासकाला दिली होती. यामुळे हा व्यवहार सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात होता.

याबाबत 'लोकमत'ने सर्वप्रथम २००३ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. यासह सिडकोने त्या काळात विविध व्यक्ती व संस्थांना केलेल्या नियमबाह्य भूखंड वाटपाची अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती. यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी डी. के. शंकरन समिती नेमली होती. समितीने या व्यवहारात सिडकोचे ५० कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट नमूद केले, तर महालेखापालांनीही २६.८५ कोटींचा आर्थिक तोट्याचा ठपका ठेवला.

न्यायालयाचा दणका...

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील आणि संजयकुमार सुर्वे यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने भूखंडवाटप् बेकायदेशीर ठरवून नोव्हेंबर २०१४ मध्ये तो रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यावर रहेजांनी सर्वोच्च न्यायालय गाठून स्थगिती मिळवली.

रहेजांनी २०१५ मध्ये भूखंडवाटप नियमितसाठी अर्ज केला होता. त्यावर शासनाने जयंत बांठिया यांची समिती नेमली. या समितीने २०१४च्या बाजारभावाने भूखंड नियमित करण्याचा अभिप्राय दिला होता. परंतु, सिडकोच्या अर्थशास्त्र विभागाने ५४७ कोटी किंमत ठरविली होती.

शासनाने राज्याच्या अॅडव्होकेट जनरलचा अभिप्राय मागितला असता, त्यांनी सिडकोने यापूर्वी ज्या दराने भूखंड नियमित केले आहेत, त्याच दराने रहेजांचा भूखंड नियमित करावा, असा अभिप्राय दिला. शासनाने ही जबाबदारी सिडकोवर ढकलली. 

त्यानंतर सिडको संचालक मंडळाने तीन वेळा यावर निर्णय घेण्यास नकार दिला. अखेर ऑक्टोबर २०२५ मधील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सिडकोला आठ आठवड्यांत निर्णय घेण्याचा कडक आदेश दिला होता.

जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच्च

उशिरा होईना ४ फेब्रुवारी २०२६ झालेल्या बैठकीत रहेजांचा नियमितीकरणाचा अर्ज मंजूर करताना दंडासह वसुलीचा मार्ग स्वीकारण्यात आला. त्यामुळे सिडकोला कोट्यवधींचा आर्थिक लाभा होणार असला तरी, २३ वर्षे नियमबाह्य व्यवहार झाकून ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार का आणि या प्रकरणातील जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.

या विषयावर अधिक माहितीसाठी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय न्यायालयात असल्याचे सांगून अधिक भाष्य करण्यास असमर्थता दर्शविली.

English
हिंदी सारांश
Web Title : CIDCO to Recover ₹250 Crore from Raheja Corp in Land Case

Web Summary : CIDCO will recover ₹250 crore from Raheja Corp for a land allocation irregularity dating back to 2003. The Supreme Court pushed CIDCO to act after years of inaction on the controversial land deal near Vashi station, following court directives and committee findings of financial losses.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcidcoसिडको लॉटरीNavi Mumbaiनवी मुंबई