शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मराठ्यांचे वादळ आज पनवेलमध्ये धडकणार; पनवेलकर देणार १० लाख बांधवांना भोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 08:19 IST

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा काढली आहे.

-अरुणकुमार मेहत्रे/ वैभव गायकरपनवेल/कळंबोली  : मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा काढली आहे. गुरुवारी पदयात्रा सकाळी १० च्या सुमारास पनवेलमध्ये धडकणार आहे. या पदयात्रेच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव पनवेलमध्ये एकवटणार आहेत. मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांसाठी रायगड सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी भोजन स्टाॅल लावण्यात येणार आहेत.

मराठा नेते मनोज जरांगे शेकडो आंदोलकांसह मुंबईकडे रवाना होत आहेत. मुंबईपूर्वीचा शेवटचा मुक्काम हा लोणावळा येथे होणार आहे. त्यानंतर  ते पनवेल, नवी मुंबईकडे रवाना होणार आहेत. या  तब्बल १० लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार १० लाख मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलावची व्यवस्था केली  आहे. घराघरांत भाकरी तयार करणार आहेत. 

मंडळांचेही स्टाॅल पदयात्रेच्या मार्गावर मराठा बांधवांच्या नाश्ता व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी विविध संघटना व मंडळांनी स्टॉल्स उभारण्याची तयारी दर्शविली आहे. सकाळपासूनच तेथे चहा, बिस्किटे, पोहे, फूड पॅकेट, फरसाण यासह फळे व पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे.

घराघरांतून भाकरीसमाजबांधवांसाठी मराठा समाजातून घरोघरी १० भाकरी किंवा २५ चपात्या, चटणी, ठेचा, लोणचे आदी पदार्थ जमा करणार आहेत. हे अन्न संकलित करण्याचे काम बुधवारपासून सुरू आहे; तसेच कामोठे, कळंबोली, खारघर पदयात्रा मार्गावर  विविध संघटनांमार्फत जेवणही बनविले जाणार आहे.

सकल मराठा समाज मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पदयात्रेचे पनवेल तालुक्यात जंगी स्वागत आम्ही करणार आहोत. यावेळी लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुस्लिम, शीख समाजानेही अन्नदानासाठी हात पुढे केला आहे. - रामदास शेवाळे, समन्वयक, सकल मराठा समाज

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNavi Mumbaiनवी मुंबई