शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सगेसोयरे कायदा होईपर्यंत उपोषण सुरूच; मनोज जरांगे यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:34 IST

समाजासाठी बलिदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे - पाटील यांनी बुधवारी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील कुणबी नोंदी ५७ लाखांवरून ६२ लाखांवर पोहोचल्या आहेत. सगेसोयऱ्यांना कुणबी नोंदी देण्याची अधिसूचना सरकारने काढली आहे. येणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठीचे निवेदन प्रत्येक आमदाराला द्या. सर्वांच्या सहमतीने सगेसोयऱ्यांचा कायदा मंजूर झाला पाहिजे. १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसत असून, कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही. समाजासाठी बलिदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे - पाटील यांनी बुधवारी केला. 

आरक्षणाच्या लढ्यामुळे मराठ्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखविली आहे. राज्यातील सकल मराठा समाजाने आपल्या मतदार संघातील आमदारांना फोन करा, निवेदन देऊन सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन करावे. सर्वमताने हा निर्णय झाला पाहिजे. मी स्वत: १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसत आहे. कायद्यात रुपांतर होईपर्यंत माघार घेणार नाही. जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईकरांचे कौतुकनवी मुंबईमधील आगरी, कोळी भवनमध्ये आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे बुधवारी आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. 

सोशल मीडियावर फूट पाडण्याचा प्रयत्न कळंबोली : अनेक वर्षांपासून आरक्षण मिळाले नव्हते, आपल्या आंदोलनामुळे ७३ लाख जणांच्या नोंदी आढळल्या आहेत. आता सोशल मीडियावर काही जण पोस्ट करून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांनी दिले. कामोठे येथे आयोजित मराठा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दोन दिवसात पाच जिल्हे फिरणारपुढील दोन दिवसांमध्ये मी ५ जिल्हे फिरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे माझी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी तीन वाजतील तरीसुद्धा मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहतील. मी माझे घरदार सोडून समाजाच्या हितासाठी लढतोय आणि आपण सर्वांनी मला जी साथ दिली त्या बळावर मी मागे हटणार नाही, असा शब्द जरांगे पाटील यांनी देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण