शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Flotel: नवी मुंबईत हाेणार  पहिले ‘फ्लोटेल’, बेलापूर-उलवे खाडीची केली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 04:13 IST

Flotel: नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीच्या परिसरात लवकरच फ्लोटेल अर्थात तरंगते फिरते हॉटेल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचा हा प्रकल्प असून, यामुळे मुंबई-नवी मुंबईतील पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मेरी टाईम बोर्डाने व्यक्त केला आहे. 

- नारायण जाधव नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीच्या परिसरात लवकरच फ्लोटेल अर्थात तरंगते फिरते हॉटेल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचा हा प्रकल्प असून, यामुळे मुंबई-नवी मुंबईतील पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मेरी टाईम बोर्डाने व्यक्त केला आहे. सध्या हा प्रकल्प निविदास्तरावर आहे. या तरंगत्या फिरत्या हॉटेलसाठी अनुभवी आणि पात्र इच्छुक भागीदारांच्या शोधासाठी मेरी टाइम बोर्डाने स्वारस्य अभिकर्त्यांसाठी देकार मागविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

‘फ्लोटेल’ हे नाव ‘फ्लोट’ आणि ‘हॉटेल’ या शब्दांचे एकत्रीकरण आहे. असे हॉटेल असते जे नद्या, सरोवरे, बंदर आणि महासागरांत एकतर तरंगते असते किंवा फ्लोट म्हणजे त्या परिसरात पाण्यावर फिरणारे असते. कायमस्वरुपी नांगरलेली जहाजे किंवा विशिष्ट मार्गांवर ही हॉटेलरुपी जहाजे परिसरात फिरत असतात. अशी ही ‘फ्लोटेल’ सर्वप्रथम १९७०  आणि ८० च्या दशकात चीन आणि हाँगकाँगमध्ये लोकप्रिय झाल्याने नंतर  कालौघात   ती जगभर पसरली.

...म्हणून केली नवी मुंबईची निवडनवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत आहे. सी लिंकच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई  शहर जवळ येणार आहे. घारापुरी लेणींसह बेलापूर किल्ला, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया, रेवस मार्गे अलिबाग जोडले जाणार आहे. यामुळे ‘फ्लोटेल’ उभारण्यासाठी बेलापूर-उलवे खाडीची निवड केली. 

बेलापूर जेट्टीवरून पर्यटकांची ने-आणबेलापूर-उलवे खाडीच्या परिसरातील नियोजित ‘फ्लोटेल’वर पर्यटकांची ने-आण करण्यासाठी बेलापूर जेट्टीवरून केली जाणार आहे. या जेट्टीचा वापर लवकरच मुंबई-नवी मुंबईसह  ठाणे-कल्याण-मीरा-भाईंदर-वसईपर्यंतच्या जलवाहतुकीसाठीही होणार आहे.

राज्य सरकारचा  ‘फ्लोटेल’ हा खूप चांगला प्रकल्प आहे. यातून नवी मुंबईचे नाव पर्यटन स्थळांच्या यादीवर जाईलच शिवाय नवी मुंबई महापालिकेलाही महसूल मिळेल. तो लवकरात लवकरात पूर्ण व्हावा यासाठी आता प्रयत्न राहिल.    - मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई