'खारघर'मधील दुर्घटनेत मृतांचा आकडा 13 वर, 10 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू 

By वैभव गायकर | Published: April 17, 2023 08:21 PM2023-04-17T20:21:39+5:302023-04-17T20:42:50+5:30

तेरा मृतांची ओळख सर्व मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

The death toll in the accident in Kharghar is 13, 10 patients are still undergoing treatment | 'खारघर'मधील दुर्घटनेत मृतांचा आकडा 13 वर, 10 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू 

'खारघर'मधील दुर्घटनेत मृतांचा आकडा 13 वर, 10 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू 

googlenewsNext

वैभव गायकर 

पनवेल - खारघरमधील महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा 13 वर पोहचला आहे. या घटनेत अद्याप 10 रुग्ण वेगवेगळया रुग्णालयात उपचार घेत आहेत. तेरा मृतांची ओळख सर्व मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

मृतांमध्ये महेश नारायण गायकर (42) वडाळा मुंबई ,जयश्री जगन्नाथ पाटील (54) म्हसळा रायगड , मंजुषा कृष्णा भोंबंडे (51) गिरगाव मुंबई,स्वप्निल सदाशिव केणी (30)शिरसाटबामन पाडा विरार,तुळशीराम भाऊ वांगड (58) जव्हार पालघर,कलावती सिद्धराम वायचळ (46)सोलापूर, भीमा कृष्णा साळवी (58)कळवा ठाणे,सविता संजय पवार (42 ) मुंबई,पुष्पा मदन गायकर (64)कळवा ठाणे,वंदना जगन्नाथ पाटील (62) करंजाडे पनवेल, मीनाक्षी मिस्त्री (58)वसई, गुलाब बबन पाटील (56)विरार,विनायक हळदणकर (55) कल्याण आदी मृत्युमुखी पावलेल्यांची नावे प्रशासनाने जाहीर केली आहेत.दरम्यान जखमी उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांमध्ये अद्यापही एमजीएम रुग्णालय कामोठे याठिकाणी 6,एमजीएम रुग्णालय वाशी याठिकाणी 3 आणि भारती मेडिकव्हर रुग्णालयात 1 असे 10 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली.उर्वरित जखमींना उपचारार्थ डिस्चार्ज देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The death toll in the accident in Kharghar is 13, 10 patients are still undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.