शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आता साकारणार देशातील पहिले तरंगते विमानतळ; व्यवहार्यता अभ्यास सुरू

By नारायण जाधव | Updated: October 10, 2025 09:28 IST

जेएनपीए, नवी मुंबई विमानतळाला जोडणार

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण येथील प्रस्तावित ऑफशोअर अर्थात समुद्रातील विमानतळाचे पुन्हा एकदा सुतोवाच केले आहे. त्याचा पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात मागविलेल्या निविदांना सात कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. यात ग्रँट थॉर्नटन-निप्पोन कोई इंडियाची निवड केली आहे. या कंपनीने सकारात्मक अहवाल दिल्यानंतरच वाढवणच्या ऑफशोअर विमानतळाला चालना मिळणार असून तसे झाल्यास ते देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ ठरणार आहे.

वाढवण येथील ऑफशोअर एअरपोर्ट संदर्भात पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी राज्याने निविदा मागवल्या होत्या. त्यांना सात कंपन्यांनी बोली दिली होती, ज्यात सीपीजी कॉर्प, क्रिएटिव्ह ग्रॅप, ग्रँट थॉर्नटन-निप्पोन कोई, पिनी ग्रॅप, रॅम्बोल, राइट्स आणि एसए इन्फ्रा या नामांकित कंपन्यांचा समावेश होता. यात कमी बोली लावणाऱ्या  ग्रँट थॉर्नटन-निप्पोन कोईची निवड केली आहे. महाराष्ट्र एअर पोर्ट  ॲथोरिटी, मेरिटाईम बोर्ड आणि जेएनपीए या तीन संस्थांचे यासाठी सहकार्य लाभले आहे.

प्रस्तावित ऑफशोअर विमानतळासाठी समुद्रात नेमका कोठे आणि किती हेक्टरचा भराव टाकायचा ती साईट निवडणे, जमिनीची गरज भासेल का, समुद्र विज्ञानाचा अभ्यास करून संभाव्य धोके कोणते आहेत, समुद्री पर्यावरण बिघडेल काय, समुद्री जलचरांना कितपत व कोणता धोका उद्वभवेल, या एअरपोर्टसाठी किती हेक्टर भराव टाकावा लागणार, त्यासाठी खडी, माती कोठून आणणार, हायड्रोलॉजिकल मूल्यांकन करावे लागणार आहे.

विमानतळाची गरज का?वाढवण येथे राज्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक खोलीच्या बंदराचे काम जेएनपीएच्या सहकार्याने सुरू झालेले आहे. यामुळे हे बंदर पूर्ण झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक वाढणार आहे. हे बंदर मुंबई-अहमदाबाद महामार्ग, नियोजित जेएनपीए दिल्ली फ्रेट कॉरिडोर, जेएनपीए-दिल्ली महामार्गासह समृद्धी आणि प्रस्तावित विरार अलिबाग कॉरिडोरच्या माध्यातून हे बंदर नवी मुंबई  आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीएला जोडण्यात येणार आहे. त्याच दृष्टीने वाढवणलाच नवे विमानतळ बांधल्यास मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूक अधिक जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's First Floating Airport: Feasibility Study Begins in Vadhvan

Web Summary : Vadhvan may get India's first offshore airport. A feasibility study is underway, exploring site selection, environmental impact, and connectivity with major transport corridors to boost cargo and passenger traffic.
टॅग्स :Airportविमानतळ