शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

वर्सोवा-विरार सागरी सेतूचा खर्च ३१,४२६ कोटींनी वाढला

By नारायण जाधव | Updated: April 4, 2023 16:42 IST

वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रस्तावित केला तेव्हा त्यांचा खर्च ३२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता; परंतु ऑक्टोबर महिन्याच्या बैठकीत या सेतूचे बांधकाम रस्ते विकास महामंडळाकडून ‘एमएमआरडीए’कडे सोपविले आले.

नवी मुंबई : महामुंबईच्या रस्ते वाहतुकीत मैलाचा दगड ठरणाऱ्या ५४ किमीच्या वर्सोवा-विरार सागरी सेतूचा खर्च ३२ हजार कोटींवरून आता थेट ६३,४२४ कोटींवर गेला आहे. या खर्चात सुमारे ३१,४२६ कोटींची वाढ झाली असून, या वाढीव खर्चास ‘एमएमआरडीए’ने मार्च महिन्यात झालेल्या १५४ व्या सभेत प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्प सुरू होण्यास झालेला उशीर, वने, पर्यावरण, ‘सीआरझेड’सह विभागाच्या परवानग्या, प्रकल्पबाधितांना देण्यात येणारी भरपाई, बांधकाम साहित्याचे वाढलेले दर यामुळे खर्च वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रस्तावित केला तेव्हा त्यांचा खर्च ३२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता; परंतु ऑक्टोबर महिन्याच्या बैठकीत या सेतूचे बांधकाम रस्ते विकास महामंडळाकडून ‘एमएमआरडीए’कडे सोपविले आले. तेेव्हा हा खर्च ४० हजार कोटींच्या गेला असून, त्यासाठी जायका अर्थसाहाय्य देण्यास तयार असल्याचे महानगर आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते; परंतु आता मार्च २०२३ मध्ये झालेल्या १५४ व्या बैठकीत हा खर्च ४० हजार नव्हे, तर थेट ६३,४२४ कोटींवर गेला असल्याचे यासाठी नेमलेल्या सल्लागांरानी आपल्या अहवालात म्हटल्याचे सांगण्यात आले.

अहवाल तयार करण्यासाठी त्याकाळी काम पाहणाऱ्या रस्ते विकास महामंडळाने सप्टेंबर २०२१ मध्ये मे. पेंटॅकल-सेमोसा यांची संयुक्त भागीदारीत नियुक्ती केली होती. त्यांनी प्रकल्पाची शक्याशक्यता, व्यवहार्हता हे तपासून हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या १५३ व्या बैठकीत सल्लागारांनी हा अहवाल सादर केला तेव्हा प्रकल्पाची अंदाजित किंमत नमूद केलेली नव्हती; परंतु ‘जायका’कडून कर्ज घेण्यासाठी; तसेच केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या संकेतस्थळावर तो प्रदर्शित करणे आवश्यक असल्याने तो अहवाल ‘एमएमआरडीए’ने रस्ते विकास महामंडळाकडून मिळविला तेव्हा या वाढीव खर्चाचा उलगडा झाल्याचे ‘एमएमआरडीए’ने आपल्या १५४ व्या बैठकीत सांगितले.

सल्लागार शुल्क २६.२३ कोटीया सागरी सेतूूचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मे.पेंटॅकल-सेमोसा यांनी २६ कोटी २३ लाख रुपये इतके शुल्क आकारले असून, यापैकी रस्ते विकास महामंडळाने त्यांना ६ कोटी ५५ रुपये दिलेले आहेत. मात्र, आता हा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडे गेल्याने त्यांच्यासोबत नव्याने करारनामा करण्यात येणार आहे; तसेच त्यांनी सादर केलेल्या अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणखी एक सल्लागार नेमण्यात येणार आहे.

मढ आयर्लंड, गोराई बीचला जोडणाररस्ते विकास महामंडळाने दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांसह उत्तर मुंबईला जोडणाऱ्या वर्सोवा ते विरार ते या ५४ किमीच्या तिसऱ्या सी-लिंकच्या सुसाध्यता अहवालास सप्टेंबर २०२१ मान्यता दिली असून हा मार्ग हा मढ आयर्लंड, गोराई बीच, आगाशीरोड येथे कनेक्ट करून मनोरी येथील खाडीपूल याचाच भाग असणार आहे.

नवी मुंबई विमानतळाला होणार फायदामुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा संपूर्ण सागरी मार्ग भविष्यात इस्टर्न फ्री वे आणि विरार-कॉरिडोरसह न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंकला जोडण्यात येणार आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे अधिक जवळ येतीलच; शिवाय दक्षिण मुंबईसह नवी मुंबई गाठणेही अधिक सुकर होणार आहे. याचा फायदा भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणार आहे.

भाईंदर-वसई खाडीपुलास लाभविस्तारित वर्सोवा-विरार सागरी सेतूचा ‘एमएमआरडीए’च्या प्रस्तावित मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या खाडीपुलासही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होऊन आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे. भाईंदर खाडीवरील हा पूल पाच किमी लांबीचा राहणार असून, तो ३०.६ मीटर रुंद असा सहापदरी राहणार आहे. या पुलावर ‘एमएमआरडीए’ १० हजार ८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई