शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा मृतदेह आढळला दगडांच्या ढिगाऱ्याखाली; एटीएम कार्ड चोरीच्या तक्रारीसाठी आला होता, पण नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:35 IST

परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे पोलिसांना कळवले असता, तेथे मृतदेह सापडला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एटीएम कार्ड हरवल्याची तक्रार देण्यासाठी आलेला तरुण दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दहा दिवसांनी या तरुणाचा दगडांखाली लपवलेला मृतदेह पोलिसांना आढळला आहे. त्याच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रबाळे एमआयडीसीमधील यादवनगर परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. बुधवारी दुपारी ट्रक टर्मिनलजवळच्या नाल्याशेजारी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. नाल्याच्या भिंतीलगत पडलेल्या या मृतदेहावर दगडांचा ढीग टाकलेला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे पोलिसांना कळवले असता, तेथे मृतदेह सापडला. 

कुजलेल्या अवस्थेत मृतदेहमृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटली नव्हती. परंतु, रबाळे एमआयडीसी परिसरातून बेपत्ता तरुणांच्या पडताळणीत तो मृतदेह यादवनगरच्या मनोज बिंद (२२) याचा असल्याचे स्पष्ट झाले. मनोज याच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पाणीपुरीचा होता स्टाॅल मनोजचा पाणीपुरीचा स्टॉल होता. त्याचे एटीएम कार्ड काही दिवसांपूर्वी हरवले होते. त्या एटीएममधून अज्ञाताने पैसे काढल्याची तक्रार देण्यासाठी तो १७ जानेवारीला रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे आला होता. परंतु, गुन्हा नोंदविण्यासाठी त्याला दुसऱ्या दिवशी बोलावले होते, असे समजते. यानंतर तो बेपत्ता झाल्याने व शोध घेऊनही न सापडल्याने कुटुंबीयांनी २१ जानेवारीला मनोज हरवल्याची तक्रार पोलिसांत केली. बुधवारी त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. त्याच्या हत्येमागचे कारण स्पष्ट नसल्याचे तसेच चौकशीसाठी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे सहायक पोलिस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

शर्टवरून पटली ओळख मनोजचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने दहा दिवसांपूर्वीच त्याची हत्या करून मृतदेह तेथे टाकल्याची शक्यता आहे. त्याच्या अंगावरील शर्टवरून कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली आहे. 

हत्येमागे एटीएम चोरीचे कारण? मनोजचे एटीएम कार्ड चोरून त्यामधून पैसे काढणाऱ्यांनी त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मनोज हा पोलिसांकडे तक्रार करणार याच भीतीतून संबंधितांनी हे कृत्य केल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी