शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CIDCO Lottery 2025 Result: सिडकोने घरांची 'ती' सोडत पुढे का ढकलली? कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:33 IST

CIDCO Lottery 2025 Result: सरकारवर नाराज असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या दबावामुळेच पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे.

नवी मुंबई : 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेतील २६ हजार घरांच्या सोडतीसाठी शनिवारचा मूहुर्त निश्चित केला होता. मात्र, काही तास अगोदर सिडकोने ही सोडत अचानक रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारवर नाराज असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या दबावामुळेच पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे.

"ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर; आमदार-खासदारांना पैशाचं आमिष"

सिडकोच्या २६ हजार घरांसाठी २१ हजार ५०० अर्जदारांनीच अर्ज शुल्कासह अनामत रक्कम भरली आहे. त्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी तळोजा येथे संगणकीय सोडतीचे आयोजन केले होते. परंतु, शनिवारी अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती सिडकोने दिली. दरम्यान, रद्द केलेल्या सोडतीसाठी १९ फेब्रुवारीला दुपारी २ ते ४ च्या दरम्यान मुहूर्त निश्चित केला आहे.

ऐन वेळी लॉटरी रद्द झाल्याने अर्जदारांनी संताप व्यक्त केला आहे. पाच महिने झाले तरी लॉटरी निघत नसल्याने अर्जदार संतप्त झाले आहे. अर्जदारांचे पैसे अडकले आहेत. तसेच  घरांच्या किंमती वाढवल्या आहेत. शिवाय सिडकोकडून लॉटरी पुढे का ढकलली याचेही कोणते ठोस कारण देण्यात आले नाही. सिडकोने अनेकांना उशिरा मेसेज पाठवले आहेत. त्यामुळे अशा अर्जदारांची  दमछाकही झाली आहे. सिडकोने दोन ओळीची सुचना जाहीर दिली आहे. यात  सिडकोच्या "माझे पसंतीचे सिडकोचे घर" गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी सुचना काढली आहे. शिवाय याबाबतचा मेसेजही पाठवण्यात आला आहे. 

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीHomeसुंदर गृहनियोजनNavi Mumbaiनवी मुंबई