दुरूस्तीसाठी ठाणो, डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद
By Admin | Updated: September 19, 2014 23:11 IST2014-09-19T23:11:19+5:302014-09-19T23:11:19+5:30
ठाणो महापालिकेच्या स्वत:च्या 21क् दशलक्ष लीटर योजनेतून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी 9 ते बुधवार, 24 सप्टेंबर सकाळी 9 वाजेर्पयत बंद राहणार आहे.

दुरूस्तीसाठी ठाणो, डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद
ठाणो : ठाणो महापालिकेच्या स्वत:च्या 21क् दशलक्ष लीटर योजनेतून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी 9 ते बुधवार, 24 सप्टेंबर सकाळी 9 वाजेर्पयत बंद राहणार आहे. या कालावधीत योजनेवरील तातडीची निगा, देखभाल व अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
या दुरुस्तीच्या कामामुळे ठाणो शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिद्धेश्वर, वंृदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, ब्रrांड, पवारनगर, टिकुजिनीवाडी, विजयनगरी, घोडबंदर रोड व खारटन रोड या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
4कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 1क् या कालावधीत या जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.