ठाणोकर खाणार 15 टन श्रीखंड

By Admin | Updated: October 2, 2014 22:56 IST2014-10-02T22:56:24+5:302014-10-02T22:56:24+5:30

दस:याला ठाणोकर 15 टन श्रीखंड फस्त करणार आहेत. शहरातील पाच प्रमुख मिठाईची दुकाने आणि राष्ट्रीय व राज्य स्तरावर असलेल्या पाच प्रमुख निर्माते यांच्या श्रीखंडाला त्यामुळे भरपूर मागणीे होती.

Thanokar will eat 15 tons of sugar | ठाणोकर खाणार 15 टन श्रीखंड

ठाणोकर खाणार 15 टन श्रीखंड

>ठाणो : दस:याला ठाणोकर 15 टन श्रीखंड फस्त करणार आहेत. शहरातील पाच प्रमुख मिठाईची दुकाने आणि राष्ट्रीय व राज्य स्तरावर असलेल्या पाच प्रमुख निर्माते यांच्या श्रीखंडाला त्यामुळे भरपूर मागणीे होती. ठाण्यातील पाच प्रमुख ,राष्ट्रीय स्तरावरील एक आणि राज्य स्तरावरील 4 अशा कॉर्पोरेट निर्मात्यांनी गेल्या महिन्यातच दस:यासाठी लागणा:या श्रीखंडाच्या ऑडर्स बुक केल्या होत्या. तर स्थानिक निर्मात्यांनी तीन दिवस आधी त्याची सज्जता केली होती. दुधाचे भाव वाढल्यामुळे त्याच्यात काहीसा चढउतार आहे. तरी त्याचा विक्रीवर कोणताही परिणाम दिसत नाही. बहुतेक ब्रॅंडच्या किमती सारख्या असल्या तरी ठाण्यातील एका स्थानिक ब्रॅंडच्या श्रीखंडाची किंमत इतरांपेक्षा दीडपट आहे. फ्रूट फ्लेवर्ड श्रीखंडाची क्रेझ असली तरी त्याला असलेली मागणी कमी आहे. त्यामानाने आम्रखंडाला भरपूर मागणी आहे.  सर्वसाधारणपणो चॉकलेट, इलायची फ्लेवर्डच्या श्रीखंडाचा दर 25क् रुपये किलो आहे. विविध फ्रूट, ड्रायफ्रूट, केशरयुक्त 3क्क् रुपये किलो आहे. 

Web Title: Thanokar will eat 15 tons of sugar