तलावांचा ऱ्हास रोखण्यासाठी ठाणेकर सरसावले; रायलादेवीवर उद्या सहल

By Admin | Updated: October 1, 2015 01:50 IST2015-10-01T01:50:59+5:302015-10-01T01:50:59+5:30

‘काहीतरी कर ठाणेकर’ या लोकमतने चालवलेल्या चळवळीअंतर्गत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव येथे २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ठाणेकरांसाठी

Thane was asked to stop the destruction of ponds; Trip to Raleigh | तलावांचा ऱ्हास रोखण्यासाठी ठाणेकर सरसावले; रायलादेवीवर उद्या सहल

तलावांचा ऱ्हास रोखण्यासाठी ठाणेकर सरसावले; रायलादेवीवर उद्या सहल

ठाणे : ‘काहीतरी कर ठाणेकर’ या लोकमतने चालवलेल्या चळवळीअंतर्गत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव येथे २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ठाणेकरांसाठी एका सहलीचे आयोजन केले आहे. या मोहिमेतून तलाव वाचवण्यासाठी प्रयत्न होणार आहे. प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या या तलावाचे ठिकाण मौजमजेचे ठिकाण बनू शकते, हे प्रशासनाच्या नजरेत आणून देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या वेळी वन मिनिट गेम शो तसेच विविध स्टॉल्स ठेवण्यात येणार असून ही सहल ठाणेकरांसाठी मोफत आहे. त्यामुळे हा तलाव सुशोभित व्हावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याने जास्तीतजास्त ठाणेकरांनी या सहल मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमतने केले आहे.

Web Title: Thane was asked to stop the destruction of ponds; Trip to Raleigh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.