ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे - पनवेल वाहतूक ठप्प
By Admin | Updated: July 29, 2016 09:23 IST2016-07-29T08:31:09+5:302016-07-29T09:23:02+5:30
नेरुळ स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे - पनवेल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे - पनवेल वाहतूक ठप्प
>
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 29 - ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नेरुळ स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे - पनवेल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळची वेळ असल्याने लोकांना कामावर जाण्याची घाई असताना वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळी आठच्या दरम्यान ठाण्याहून पनवेलकडे जाणारी डाऊन लोकल नेरुळ रेल्वे स्थानकात पोहोचली असताना तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली. रेल्वे कर्मचा-यांनी बिघाड दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कधीपर्यंत काम पुर्ण होईल याची माहिती मिळालेली नाही.