ठाणे स्थानकाचा होणार ‘मेगा’विकास
By Admin | Updated: February 18, 2015 02:38 IST2015-02-18T02:38:29+5:302015-02-18T02:38:29+5:30
पश्चिम रेल्वेमार्गावरील काही स्थानकांप्रमाणेच मध्य रेल्वेमार्गावरील गर्दीचे स्थानक असलेल्या भांडुप आणि मुलुंड स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला.

ठाणे स्थानकाचा होणार ‘मेगा’विकास
मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील काही स्थानकांप्रमाणेच मध्य रेल्वेमार्गावरील गर्दीचे स्थानक असलेल्या भांडुप आणि मुलुंड स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला. त्यासाठी या स्थानकांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास केला जाणार होता. मात्र हा विकास रखडला असून, आता ठाणे स्थानकाचा ‘मेगा’विकास करण्यावर भर देण्यात
येणार आहे. यासाठी सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण केले जाणार आहेत.
भांडुप आणि मुलुंड स्थानकांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या दोन्ही भागांचा वाढता विकास आणि स्थानकातली वाढती गर्दी पाहता त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. रेल्वेला तिकिटांच्या माध्यमातून भांडुप स्थानकातून चार लाख तर मुलुंड स्थानकातून साडेसात लाखांचा प्रतिदिन महसूल मिळतो. हे पाहता या स्थानकांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला. यासाठी दोन्ही स्थानकांचा सर्व्हे करून २०१३मध्ये त्याचा अहवालही तयार केला. प्रवाशांना आकर्षित करू शकतील, अशा सोयी देण्याचा निर्णयही घेतला. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून कामांची मंजुरी मिळवण्यात आली. २०१५पर्यंत भांडुप आणि मुलुंड स्थानकांचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
फलाटांवर चांगली आसनव्यवस्था, उत्तम दर्जाची प्रसाधनगृहे देतानाच एक मजली रेल्वेची इमारत बांधून त्यामध्ये तिकीट खिडक्या, बुक स्टॉल, खाद्यपदार्थ स्टॉलची सेवा देण्यात येईल. तसेच पंखे, विद्युत रोशणाई बदलताना पार्किंग सुविधाही मोठ्या प्रमाणात प्रवाशांसाठी देण्यात येणार आहे.