ठाण्यात गुंडाची पोलिसाला मारहाण
By Admin | Updated: October 16, 2014 23:02 IST2014-10-16T23:02:25+5:302014-10-16T23:02:25+5:30
एकीकडे निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.

ठाण्यात गुंडाची पोलिसाला मारहाण
ठाणो : एकीकडे निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. असे असताना कापूरबावडी भागात मात्र सुनील जाधव ऊर्फ जग्या याने पोलिसांना मारहाण केली आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ठाणो कारागृहात एका कैद्याने पोलिसांना मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच हा दुसरा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कापूरबावडी ठाण्यातील पोलीस नाईक जगन्नाथ कोळी नेहमीप्रमाणो बुधवारी रात्री गस्त घालत होते. त्या वेळी धर्मवीरनगर येथे सुनील हातात काठी घेऊन परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक टक्के यांच्यासह पोलिसांची कुमक कोळी आणि त्यांचे सहकारी याला शांत करण्यासाठी त्याच्याजवळ गेले. पण, त्याच वेळी जाधवने सहायक पोलीस निरीक्षक पाटील आणि जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण केली. कामात अडथळा आणून पोलिसावरच हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अखेर अटक केली आहे. यावरून गुंडांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी टिका परिसरातील नागरिक करीत आहेत. तर पोलीस गुंडावर कठोर कारवाई करण्याचा निर्वाळा देत आहेत.