ठामपाच्या योजना निराधार
By Admin | Updated: November 12, 2014 02:16 IST2014-11-12T02:16:31+5:302014-11-12T02:16:31+5:30
झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत.

ठामपाच्या योजना निराधार
अजित मांडके - ठाणो
झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत. यातील वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेन्ट आणि रिमॉडलींग प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली असली तरी आता जेएनयूआरएम अर्थात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियानच बंद होणार असल्याने, हे प्रकल्प कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
याच योजनेच्या भरवशावर पालिकेने राजीव आवास योजना आणि नाल्यांच्या एकात्मिक विकास प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार कोटींचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले आहेत. परंतु,केंद्राकडून अद्याप यासंदर्भात कोणताही सिग्नल न आल्याने या प्रकल्पांच्या अभ्यासासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट
तत्कालीन महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून ठाण्याच्या खाडीचा विकास (वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट) करण्याची योजना पुढे आली होती. खाडीचा विकास करताना बोटिंग, जलक्रीडा, जलवाहतूक, मॅनग्रोव्ह टेल्स, जॉगिंग ट्रॅक्स, सायकल ट्रॅक्स, मिनी पिकनीक सेंटर आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
ठाणो शहर, खारेगाव, साकेत, बाळकूम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेती बंदर, मुंब्रा आणि दिवा आदी ठिकाणच्या खाडी किना:याचा या माध्यमातून विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी 125 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांना तत्कालीन केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु सरकार बदलल्यानंतर जेएनएनयूआरएम ही योजनासुध्दा बंद झाली. त्यामुळे आता केंद्राने निधी नसल्याचे कारण पुढे केले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे एक हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. तसेच खाडी किनारी एक पंप हाऊस तयार करण्यात येणार आहे. शहरातील सर्व नाले हे खाडी किनारी जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाला आहे.घोडबंदर, मुंब्रा आणि दिवा गावातील पाण्याच्या समस्या सोडविण्याबरोबर येथे सांडपाणी वाहिनी टाकण्याची सुमारे 7क्क् कोटींची योजना आखली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविली होती.
राजीव आवास योजनेचा देखील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. चार टप्प्यांत ती पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार घरे खारटन रोड आणि चेंदणी कोळीवाडा येथे उभारली जाणार आहेत. ज्या प्रभागांत ही योजना तत्काळ पूर्ण होऊ शकते,अशा 1क् प्रभागांचा सव्र्हे पूर्ण झाला आहे. यामध्ये वसंत विहार, कोपरी, सिध्दार्थनगर, म्हाडा कॉलनी, राबोडी आदी भागांचा यात समावेश आहे. याचा अभ्यास करण्यासाठी देखील पालिकेने लाखोंचा निधी खर्च केला आहे. या दोन्ही योजनांबाबत पालिकेने वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. केंद्राने निधी दिला नाही, तर या योजनांचा गाशा गुंडाळावा लागणार आहे.