खारघरमधील हॅप्पी स्ट्रीटमध्ये थिरकले आबालवृद्ध

By Admin | Updated: March 16, 2017 03:15 IST2017-03-16T03:15:02+5:302017-03-16T03:15:02+5:30

खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून रविवारी सेंट्रल पार्कयेथे आयोजित केलेल्या हॅप्पी स्ट्रीट या कार्यक्रमाला खारघरवासीयांचा उदंड

Thakkale Abalwari in Happy Street in Kharghar | खारघरमधील हॅप्पी स्ट्रीटमध्ये थिरकले आबालवृद्ध

खारघरमधील हॅप्पी स्ट्रीटमध्ये थिरकले आबालवृद्ध

पनवेल : खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून रविवारी सेंट्रल पार्कयेथे आयोजित केलेल्या हॅप्पी स्ट्रीट या कार्यक्रमाला खारघरवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्धांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ होते.
सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांसाठी झुंबा, योगा, लगोरी, फुटबॉल, बॅडमिंटन, बच्चे कंपनीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खारघरमधील शेकडो नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन विविध खेळांचा आनंद लुटला.
खारघर जिमखाना स्पोर्ट्सचे अध्यक्ष गुरुनाथ गायकर व खारघर पटेल समाजाचे अध्यक्ष विनोद पटेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इंटरनेटच्या युगात मैदानी खेळांचा सर्वानाच विसर पडला आहे. आपले स्वास्थ चांगले आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शहरी भागातील धकाधकीच्या जीवनात अशाप्रकारच्या कार्यक्र माद्वारे नागरिकांचे आरोग्य जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे या अभिनव उपक्रमाबद्दल आयोजक गुरुनाथ गायकर यांनी सांगितले. लहान मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने आरोग्याच्या विविध प्रकारच्या मैदानी, तसेच सध्या लगोरी सारखे खेळ शहरी भागात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या उपक्रमाद्वारे मैदानी खेळाची नवी ओळखही नव्या पिढीला होत असते. झुंबा या पाश्चिमात्य देशात संगीताच्या तालावर केल्या जाणाऱ्या नृत्यप्रकारामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते. हसत, खेळत संगीताच्या तालावर केला जाणारा हा व्यायामाचा प्रकार शहरी भागात लोकप्रिय होत आहे. झुंबा या व्यायामाच्या प्राकारावरही या वेळी जमलेले शेकडो नागरिक थिरकले.
कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये खारघर सिडकोचे प्रशासक सीताराम रोकडे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू राजेंद्र सोनी, सुदर्शन नाईक, सचिन पाटील, माजी उपसरपंच संतोष गायकर, हुसेन साबुवाला, प्रेमनाथ गायकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Thakkale Abalwari in Happy Street in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.