‘ठाकरे बंधूंनी सामोपचाराने तोडगा काढावा’
By Admin | Updated: December 13, 2014 02:21 IST2014-12-13T02:21:07+5:302014-12-13T02:21:07+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेच्या वादावर उद्धव व जयदेव ठाकरे यांनी सामोपचाराने तोडगा काढावा, असा सल्ला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला़

‘ठाकरे बंधूंनी सामोपचाराने तोडगा काढावा’
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेच्या वादावर उद्धव व जयदेव ठाकरे यांनी सामोपचाराने तोडगा काढावा, असा सल्ला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला़
बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवरून या दोघा भावांमध्ये वाद आह़े याची सुनावणी सध्या न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर सुरू आह़े त्यात न्यायालयाने हा सल्ला दिला व ही सुनावणी येत्या 17 डिसेंबर्पयत तहकूब केली़ दरम्यान, बाळासाहेबांचे मृत्युपत्र तयार करताना हजर असलेले अॅड़ एफ़ डिसोजा यांची उलटतपासणीही शुक्रवारी झाली़ बाळासाहेबांना मृत्युपत्रच्या मसुद्याची माहिती दिली जात होती व त्यांच्या सूचनेनुसारच यात बदल केले जात होते, असे डिसोजा यांनी न्यायालयाला सांगितल़े (प्रतिनिधी)