रक्तचंदन तस्करीतील आरोपी मोकाट
By Admin | Updated: October 22, 2016 03:20 IST2016-10-22T03:20:19+5:302016-10-22T03:20:19+5:30
वनविभागाच्या वतीने पनवेल येथे काही वर्षांपूर्वी १२ टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावरच वरिष्ठांनी खोटे आरोप करीत

रक्तचंदन तस्करीतील आरोपी मोकाट
तळोजा : वनविभागाच्या वतीने पनवेल येथे काही वर्षांपूर्वी १२ टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावरच वरिष्ठांनी खोटे आरोप करीत सेवेतून बडतर्फ केल्याची प्रतिक्रिया पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी वनाधिकारी कृष्णा आलूलकर यांनी व्यक्त
केली.
पनवेलमधील १२ टन रक्तचंदन तस्करी प्रकरणात आम्ही पुराव्यासह सर्व माहिती दिली होती. मात्र इतर आरोपींची माहिती शासनापर्यंत पोचली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाला चार ते पाच वर्षे उलटूनही अद्याप रक्तचंदन तस्कराची टोळी मोकाटच असल्याचे त्यांनी सांगितले.
पनवेल येथे वन विभागाने सप्टेंबर २०१२ ते १३ या काळात तब्बल बारा टन रक्तचंदन सापळा रचून ताब्यात घेतले होते. जप्त केलेल्या रक्तचंदनाची एकूण किंमत २ कोटी होती. हा मुद्देमाल शासनाच्या ताब्यात आहे.
या प्रकरणातील खरे अद्याप मोकाट असून मला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले आहे. रक्तचंदन प्रकरणी जप्त करण्यात आलेले पुरावे नष्ट करण्याचाही
प्रयत्न झाल्याचा आरोप यावेळी आलूलकर यांनी केला आहे.
(वार्ताहर)