शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

दहा गावांतील ठेकेदारांचे साखळी उपोषण, ३०० पेक्षा जास्त डंपर ठेवले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:15 AM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती आली आहे. सिडकोने जोरात या कामांना सुरुवात केली आहे.

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती आली आहे. सिडकोने जोरात या कामांना सुरुवात केली आहे. मात्र, या कामांमध्ये मोठे ठेकेदार, सिडको प्रशासन स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. ठरल्याप्रमाणे संबंधितांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने दहा गावांतील स्थानिक विमानतळ बाधित ठेकेदारांनी प्रशासन व मोठ्या ठेकेदारांविरोधात बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रकल्पग्रस्त लॉरीमालक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांनी शुक्रवारी ओवळे ग्रामपंचायत हद्दीत बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.शेकडो विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त ठेकेदार या उपोषणात सहभागी झाले आहेत. प्रकल्पग्रस्त कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सचिव विकास म्हात्रे, उपाध्यक्ष विजय मेहेर, कमी तारेकर यांच्यासह या वेळी शेकडो ठेकेदार उपोषण स्थळी उपस्थित होते. तसेच होणाºया अन्यायाविरोधात विमानतळ क्षेत्रात कार्यरत असलेले ३०० डंपर, जेसीबी बंद ठेवण्याचा निर्णय या ठेकेदारांनी घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामांमध्ये प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना प्रकल्पात रोजगार दिले जातील, या अनुषंगाने या ठिकाणी कामे दिले जातील, असे सिडकोने मान्य केले आहे. सिडकोच्या विविध विकासकामांचे टेंडर जीव्हीके, गायत्री आणि बालाजी या बड्या कंत्राटदारांनी घेतले आहे. तर कंत्राटदारांचे सब कंत्राटदार म्हणून टीआयपीएल आणि जेएम म्हात्रे इन्फ्रा यांनी एकत्रित भागीदारी करून काम हाती घेतले आहे. प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना या ठिकाणच्या विकासकांमाच्या अनुषंगाने सिडको प्रशासनाने १६ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन त्यांना डंपर, पोकलेन यांचे प्रतिफेरीचे दर निश्चित करून दिले. या यानुसार पोकलेन प्रतितास १६५० (बकेट), पोकलेन प्रतितास १९५० (ब्रेकर), तर डंपर प्रतिफेरी ६५० रु पये २ कि.मी.पर्यंत असा दर ठरला. १५ नोव्हेंबरपर्यंत या दराप्रमाणे मोठ्या ठेकेदारांनी आपली वाहने चालवली. सब कंत्राटदारांकडे सुरू केली.सिडकोने दिलेले दर हे १५ नोव्हेंबरपर्यंत लागू असल्याने त्यानंतर नव्याने दर ठरविण्यासाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदार सब कंत्राटदाराकडे गेल्याने त्यांना पोकलेनचा दर प्रतिडंपर २७५ रु पये (बकेट) तर डंपर दर प्रतिफेरी ४०० रु पयांपर्यंत देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. या नवीन दरामध्ये पूर्वीच्या दरापेक्षा मोठी तफावत असल्याने या नवीन दरानुसार आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याने या ठेकेदारांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून यासंदर्भात मध्यस्तीची भूमिका घेण्याची विनंती केली आहे.प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या उपोषणाला शांततेत सुरु वात करण्यात आली. या वेळी पोलिसांचाही मोठा फौजफाटा उपोषणस्थळी उपस्थित होता. या उपोषणाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत व कामगारनेते महेंद्र घरत यांनी पाठिंबा दर्शविला. ठेकेदारांच्या भूमिकेमुळे विमानतळ क्षेत्रातील कामांची गती मंदावणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ