शिक्षकांनी काळानुरूप अपडेट राहणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 03:38 IST2016-09-02T03:38:59+5:302016-09-02T03:38:59+5:30

शिक्षक हा आनंदयात्री आहे. त्याने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आजचे विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळणारे, टेक्नोसॅव्ही असल्याने शिक्षकांनीही काळानुरूप

Teachers need to keep up to date in the dark | शिक्षकांनी काळानुरूप अपडेट राहणे गरजेचे

शिक्षकांनी काळानुरूप अपडेट राहणे गरजेचे

पनवेल : शिक्षक हा आनंदयात्री आहे. त्याने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आजचे विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळणारे, टेक्नोसॅव्ही असल्याने शिक्षकांनीही काळानुरूप अपडेट राहणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात सरकारच्या धोरणामुळे काहीसा गोंधळ असला तरी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे, असा सल्ला विधान परिषदेतील शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी पनवेल येथील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात शिक्षकांना दिला.
‘लोकमत’ व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर व पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०१६’ मोठ्या दिमाखात बुधवारी येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला.
पनवेल तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास विधान परिषदेतील शिक्षक आमदार रामनाथ मोते, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय सोनावणे, दीपक फर्टिलायझर व पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष परेश त्रिवेदी, उपाध्यक्ष श्रीपाद लेले, महाव्यवस्थापक जयश्री काटकर, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ‘लोकमत’चे साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
मोते म्हणाले, शिक्षण क्षेत्रात काम करण्यासारखे दुसरे भाग्य नाही. केवळ नोकरी-व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे न बघता विद्यादानाचे महत्कार्य हातून होत असल्याने शिक्षकांना दीर्घायुष्य लाभत असल्याचे आढळते. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी उंचावली आहे, ते वेगळा विचार करू लागले आहेत. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या उत्तराची अपेक्षा न करण्याचा सल्ला मोते यांनी यावेळी शिक्षकांना दिला. जनसेवा करताना, शिक्षक, उद्योजक ते राजकारणी या प्रवासात ‘लोकमत’ची साथ मिळाल्यानेच लोकांपर्यंत पोहाचू शकलो. गेल्या अनेक वर्षांपासून ‘लोकमत’शी नाळ जोडली असून ती भविष्यातही कायम राहावी, अशी इच्छा यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली.
आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा म्हणजे गणेशोत्सवापूर्वी झालेली चांगली सुरुवात असल्याचे विचार ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. शिक्षणाचे व्यापारीकरण होत असताना शिक्षकांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देत आहोत. आदर्श शिक्षकांंच्या निवडीची जबाबदारी शाळेकडेच सोपविण्यात आली होती. सोहळ्याच्या माध्यमातून एक नवी संकल्पना साकार होऊन पुढील वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आणखी नावे येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केली.

Web Title: Teachers need to keep up to date in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.