विनयभंग प्रकरणी शिक्षकाला अटक

By Admin | Updated: January 25, 2017 05:02 IST2017-01-25T05:02:26+5:302017-01-25T05:02:26+5:30

विद्यार्थीनीच्या विनयभंग केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. वाशीतील आयसीएल शाळेत पाचवीतल्या

The teacher was arrested in the molestation case | विनयभंग प्रकरणी शिक्षकाला अटक

विनयभंग प्रकरणी शिक्षकाला अटक

नवी मुंबई : विद्यार्थीनीच्या विनयभंग केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. वाशीतील आयसीएल शाळेत पाचवीतल्या विद्यार्थीनीच्या तक्रारीनुसार या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील रोकडे (४९) असे शिक्षकाचे नाव आहे. शाळेच्या आवारात सर्व मुली रांगेत जात असताना तक्रारदार मुलीच्या शरीराला रोकडेच्या हाताचा स्पर्श झालेला. यावरुन विद्यार्थीनीच्या मैत्रिणींकडून तिची खिल्ली उडवली जात होती. नेमके तुलाच स्पर्श होण्यामागे वेगळे कारण असल्याची शंका त्यांच्याकडून व्यक्त होत होती. अखेर विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानुसार पालकांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरुन वाशी पोलिसांनी सुनील रोकडेला अटक केले. पोलीस कोठडीनंतर आता रोकडेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The teacher was arrested in the molestation case