कोपरखैरणेत विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:28 IST2020-10-10T00:28:18+5:302020-10-10T00:28:27+5:30
वर्षभर करत होता ब्लॅकमेल; खासगी क्लासमधील प्रकार

कोपरखैरणेत विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक
नवी मुंबई : विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेलिंग करणाºया खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षी त्याने या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर लॉकडाऊन लागल्यापासून तिला ब्लॅकमेल करून धमकावत होता. या प्रकरणी पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली असता, गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या शिक्षकाचे नाव संजय भालचंदानी असे आहे. त्याचे वाशी येथे कोचिंग आहे. त्याच क्लासमध्ये बारावीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थिनीसोबत त्याने गैरकृत्य केले होते. भालचंदानीकडील क्लास संपल्यानंतर ही विद्यार्थिनी इतर एका क्लाससाठी जायची. दोन्ही क्लासच्या मधल्या रिकाम्या वेळेत अधिक अभ्यास घेतो, असे सांगून तो विद्यार्थिनीला कोपरखैरणेतील घरी घेऊन गेला होता. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून कोणाला न सांगण्याची धमकी दिली होती. यामुळे पीडित मुलीने मौन बाळगल्याची संधी साधत, त्याने महिन्याभरात पुन्हा एकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर, विद्यार्थिनीचे बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्याने तिचा क्लासचा संपर्क तुटला होता, परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत शिक्षकाने पीडित मुलीला ब्लॅकमेल करून पुन्हा धमकावले. शिक्षकाकडून वाढत्या अत्याचाराला कंटाळून विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. याचा जाब विचारण्यासाठी तिचे आई-वडील गेले असता, त्याने मित्राच्या मदतीने त्यांना हाकलून दिले होते. त्यानंतर, पालकांनी परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडे घडलेल्या घटनेची तक्रार केली होती. त्यानुसार, गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परिचारिकेच्या विनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक
नवी मुंबई : पीपीई किट घालण्यावरून परिचारिकेसोबत जवळीक करू पाहणाºया डॉक्टरला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी संध्याकाळी वाशीतील एम.जी.एम रुग्णालयाच्या सोनोग्राफी विभागात हा प्रकार घडला. शिकाऊ परिचारिका म्हणून काम करणाºया मुलीसोबत हा प्रकार घडला. गुरुवारी संध्याकाळी ती सोनोग्राफी सेंटरमध्ये पीपीई किट घालून गेली होती.
मात्र, किट व्यवस्थित घातला नसल्याचे सांगत, तिथला डॉक्टर अमोल शेवाळे याने तिच्यासोबत अश्लील बोलत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिचारिकेने त्याला विरोध करून थेट घर गाठून घडलेल्या प्रकारची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानुसार, वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता, शुक्रवारी सकाळी शेवाळेला अटक करण्यात आली आहे.