टॅक्सी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

By Admin | Updated: October 12, 2016 04:48 IST2016-10-12T04:48:45+5:302016-10-12T04:48:45+5:30

नेरळ - माथेरान घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे टॅक्सी चालकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नेरळ -माथेरान

Taxis alert movement | टॅक्सी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

टॅक्सी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

नेरळ : नेरळ - माथेरान घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे टॅक्सी चालकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नेरळ -माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी संघटनेच्यावतीने एमएमआरडीचे कार्यकारी अभियंता यांना या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाच्या प्रती त्यांनी कर्जतचे तहसीलदार, आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांना दिले होते. परंतु अनेक दिवस उलटूनही या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने त्यांनी १८ आॅक्टोबर रोजी या रस्त्यावर नेरळ ते दस्तुरी नाक्यापर्यंत चक्का जाम करून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नेरळ -माथेरान घाट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यासाठी नेरळ -माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने नेरळ राय हॉटेल येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या रस्त्याकडेप्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने त्यांनी १८ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. माथेरानला जाण्यासाठी नेरळ १ नंबर नाक्यावरून एकमेव रस्ता आहे. परंतु या रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करवा लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहने नादुरु स्त होत असून त्याचा आर्थिक भुर्दंड आणि शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघातातही होत आहेत. यामुळे टॅक्सी संघटना आक्र मक झाली आहे. प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर कोणतीही उपाययोजना करत नाहीत. त्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत असून याला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, असे यावेळी टॅक्सी संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. तसेच हा रस्ता तयार करण्याला वनविभागाचा अडथळा येत आहे, असे टॅक्सी संघटनेला एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. परंतु अनेक महिन्यांपासून हे काम सुरू आहे. परंतु या अगोदर या रस्त्याला वनविभागाचा अडथळा नव्हता. परंतु वनविभाग आता का अडथळा आणत आहेत, असे अनेक प्रश्न नेरळ-माथेरान टॅक्सी चालक -मालक संघटनेने उपस्थित केले आहेत. तसेच अनेक ठिकाणी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके, उपाध्यक्ष हनीफ नजे, रवींद्र मिसाळ, कार्याध्यक्ष आनंद कोकाटे, चेतन दिसले, खजिनदार सचिन लोभी, किशोर कराळे, सेक्र ेटरी अर्जुन नाईक, दत्ता जाधव, माजी अध्यक्ष प्रवीण पोलकम, कमलाकर भागीत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Taxis alert movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.