शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पनवेलमध्ये प्रथमच ‘टँकर’ धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 00:24 IST

पनवेल शहरासाठी ग्रामीण भागात सध्या पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरासाठी ग्रामीण भागात सध्या पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. पनवेल महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातील पाणीसाठा जानेवारी अखेरपर्यंत संपुष्टात येतो. अशावेळी पनवेल शहरातील पाणीपुरवठा टँकरवर अवलंबून असतो. मात्र टँकर चालकांकडून नागरिकांची लूट करण्यात येते. टँकरच्या दरामध्येही चढ-उतार केली जाते. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी ‘टँकर धोरण’ ठरविले आहे. पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी तसेच पालिकेच्या ठेकेदार असलेल्या टँकर मालकांवर नियंत्रण राहील.पनवेल महापालिका क्षेत्रात विविध संस्थांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहर, मोठा खांदा, छोटा खांदा, पोदी विभागासह पालिकेत समाविष्ट २९ गावांत पाणीपुरवठ्याची जबाबदारी पालिकेची आहे. या व्यतिरिक्त खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, तळोजा या नोडमध्ये सिडकोकडून पाणीपुरवठा केला जातो. सिडको, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत हा पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळे टँकर पुरविण्याचे कंत्राट देण्यात येते. मात्र त्यात सुसूत्रता नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येतात.पालिकेच्या कंत्राटदाराव्यतिरिक्त खासगी टँकरनेही पाणीपुरवठा होत असून आकारण्यात येणारे दर अव्वाच्या सव्वा असल्याचे पालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. खासगी टँकर पाणी कुठून आणतात, त्याचा दर्जा काय, याची माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो. याचा विचार करून पालिकेने टँकरसंदर्भात नवीन धोरण ठरविले आहे.>असे असेल टँकर धोरण; पाणीवाटपात येणार सुसूत्रतापालिकेतर्फेपुरविण्यात येणाºया टँकर्सवर ‘पनवेल महापालिका सेवार्थ’ असे ठळक लिहिणे बंधनकारक आहे. पालिकेमार्फत पुरविण्यात येणाºया टँकर्स चालकांकडून स्वत:चे पाण्याचे स्रोत, सिडको, एमआयसीडी, एमजेपी या खात्रीलायक स्रोतातूनच पुरवठा केला जाईल. लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत टँकरची मागणी केली असल्यास त्याचे शुल्क आकारण्याची जबाबदारी देखील त्या प्रतिनिधींची राहील पालिकेने ठरवून दिलेल्या दरानुसारच खासगी टँकरचालकांना पिण्याचे पाणी पालिका क्षेत्रात पुरवावे लागेल. खासगी टँकर चालकांनी पाण्याच्या स्रोताची माहिती महा-पालिकेला देणे बंधनकारक राहील. टँकर्सची मागणी लेखी स्वरूपात आल्यानंतरच पालिकेमार्फत टँकरने पाणीपुरवठा केला जाईल. परवानगीशिवाय पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करता येणार नाही. टँकरचे दर पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.खासगी टँकर चालकांना पालिकेचा अधिकृत परवाना अनिवार्य राहील.पालिकेमार्फत पाणीपुरवठा होत नसल्यास टँकरचे शुल्क आकारले जाणार नाही.>पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी टँकर धोरण अमलात आणले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला नागरिकांच्या अनेकदा तक्रारी आल्या असून त्याची दखल घेत हे धोरण आखण्यात आलेले आहे.- गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगर पालिका>टँकर धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त पालिकेच्या हौदावर पालिकेचा जबाबदार अधिकारी व कर्मचारी पूर्णवेळ नियुक्त असावा. तसेच टँकरची नोंदणी संगणकीकृत केल्यास धोरणामध्ये आणखीन पारदर्शकता येईल.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते,पनवेल महानगरपालिका>पालिकेचे टँकरसंदर्भात धोरण निश्चितच चांगले आहे. या धोरणामुळे संपूर्ण पालिका क्षेत्रातील टँकर चालकांवर नियंत्रण येणार आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या नावाखाली टँकर चालकांकडून सर्वसामान्यांची लूट होणार नाही. नागरिकांना या धोरणामुळे दिलासा मिळेल.- प्रकाश बिनेदार, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका