तामिळनाडूतील फरार गुन्हेगार अटकेत

By Admin | Updated: September 22, 2015 03:51 IST2015-09-22T03:51:43+5:302015-09-22T03:51:43+5:30

तामिळनाडू येथून दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशीतून अटक करण्यात आली. डीएमके पक्षाच्या माजी मंत्र्याच्या

Tamil Nadu absconding accused arrested | तामिळनाडूतील फरार गुन्हेगार अटकेत

तामिळनाडूतील फरार गुन्हेगार अटकेत

नवी मुंबई : तामिळनाडू येथून दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशीतून अटक करण्यात आली. डीएमके पक्षाच्या माजी मंत्र्याच्या स्विय्य साहाय्यकाच्या हत्येचा त्याच्यावर आरोप आहे. सन २०१३पासून तो तामिळनाडू पोलिसांना चकमा देत होता.
तामिळनाडूच्या डीएमके पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री लालगुंडी यांचा स्विय्य साहाय्यक पोट्टू सुरेश याची ३१ जानेवारी २०१३ रोजी हत्या झाली आहे. डीएमके पक्षाचाच कार्यकर्ता पी पांडी उर्फ अटॅक पांडी याने त्याच्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले होते. यानुसार त्याच्यावर तामिळनाडूच्या मदुराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या हत्येमागे राजकीय कारण असल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मारेकरूंना अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधार पांडीच्या शोधात तामिळनाडू पोलीस होते. परंतु दोन वर्षांपासून तो चकमा देत होता. अखेर नवी मुंबईत जुहूगाव येथे तो राहत असल्याची माहिती मदुराई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्तांसह मदुराई पोलिसांचे एक पथक वाशीत दाखल झाले होते. त्यांनी जुहूगाव परिसरातून पांडीला पकडण्याचाही प्रयत्न केला. परंतु गावठाणातील गल्लीबोळांमुळे त्यांना कारवाईत अडथळा आला. यामुळे सोमवारी सकाळी वाशी पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. वाशी सेक्टर ११ येथील बारलगत तो आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. पांडी हा मदुराईचा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर १३हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वाशी पोलिसांनी त्याला सीबीडी न्यायालयात हजर करून तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Tamil Nadu absconding accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.