शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा आग दुर्घटना : वरिष्ठांच्या हलगर्जीमुळे जवानाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 06:47 IST

Taloja fire accident: तळोजा येथे घडलेल्या आगीच्या घटनेत जवानाचा मृत्यू वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसून येत आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : तळोजा येथे घडलेल्या आगीच्या घटनेत जवानाचा मृत्यू वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन जवान बाळू देशमुख यांना वायुबाधा झालेली असतानाही तत्काळ रुग्णालयात पाठवले नाही. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.तळोजा एमआयडीसीमधील मोदी फार्मा या कंपनीत शुक्रवारी मध्यरात्री आग लागली होती. आग अधिक मोठी असल्याने ती विझवण्यासाठी तळोजा एमआयडीसीसह रबाळे एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका तसेच अंबरनाथ एमआयडीसी यांचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवत असताना अंबरनाथ अग्निशमन दलाचे जवान बाळू देशमुख यांना चक्कर आली. कंपनीतील क्लोरीन व बेन्झीन जळाल्याने त्यापासून तयार झालेल्या विषारी वायूमुळे त्यांना बाधा झाली होती. विशेष म्हणजे त्यांनी दिवसपाळी केलेली असतानाही रात्रपाळीच्या कॉलवर पाठवण्यात आले होते. तसेच बाधा झाल्यानंतर तत्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. परंतु देशमुख यांना अग्निशमन गाडीतच विश्रांतीसाठी झोपविण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत उलटी झाल्यावरही वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बचावकार्यावेळी अंबरनाथ अग्निशमन केंद्राचे निर्णयक्षम अधिकारी तेथे असणे आवश्यक होते. मात्र ते घटनास्थळी नसल्याने देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय होऊ शकला नाही. परिणामी त्यांच्या मृत्यूला संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भाऊ उत्तम देशमुख यांनी केला आहे. शहिदाचा मान डावलला देशमुख यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्याने त्यांना शहिदाचा मान मिळणे आवश्यक आहे. परंतु एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंत्यविधीकडे पाठ फिरवली. अंबरनाथ अग्निशमन केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केवळ सलामी देण्यात आली. 

घटनास्थळी अंबरनाथच्या जवानांसोबत वरिष्ठ अधिकारी नव्हते. मी स्वतः कॉल लीड करत कंपनीच्या आतमध्ये होतो. यादरम्यान देशमुख यांना बाधा झाल्याने गाडीत झोपले होते. काही वेळाने त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने रुग्णालयात पाठवले.- दीपक गांगुर्डे, अग्निशमन अधिकारी, तळोजा   

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल