तळवलीत इमारतीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:20 IST2017-07-30T02:20:28+5:302017-07-30T02:20:28+5:30
सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कंबर कसली आहे. पावसाळा असतानाही नव्याने उभारणाºया बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

तळवलीत इमारतीवर कारवाई
नवी मुंबई : सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कंबर कसली आहे. पावसाळा असतानाही नव्याने उभारणाºया बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यानुसार शुक्रवारी तळवली गावातील एका चार मजली इमारतीवर हातोडा मारण्यात आला. याअंतर्गत ७00 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना अभय दिले आहे. त्यामुळे नव्याने उभारणाºया बांधकामांवर कठोर कारवाई केली जात आहे. विशेष पावसाळा असतानाही कारवाईचा धडाका सुरूच ठेवण्यात आला आहे. नवीन बांधकामे उभारू नये, अशा आशयाचे आवाहन करूनही बांधकामांचा धडाका सुरूच असल्याने सिडकोने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार तळवली गावात काम सुरू असलेल्या एका चार मजली इमारतीवर शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. पहिल्या दिवशी ब्रेकरच्या सहाय्याने इमारतीचे स्लॅब पाडून टाकण्यात आले. टप्प्याटप्प्याने संपूर्ण इमारत जमीनदोस्त करून सदर भूखंड ताब्यात घेतला जाणार असल्याची माहिती सिडकोच्या संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी दिली.