पनवेलमध्ये स्वाइन फ्लू पसरतोय!

By Admin | Updated: September 26, 2015 23:16 IST2015-09-26T23:11:21+5:302015-09-26T23:16:30+5:30

परिसरात स्वाइन फ्लू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसात 30 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे

Swine Flu is spreading in Panvel! | पनवेलमध्ये स्वाइन फ्लू पसरतोय!

पनवेलमध्ये स्वाइन फ्लू पसरतोय!

पनवेल : परिसरात स्वाइन फ्लू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसात 30 रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 22 रुग्णांमध्ये लक्षणे आढळली आहेत. खासगी रु ग्णालयात टॅमी फ्लूच्या गोळ्या सहज उपलब्ध होत असल्याने बर्याच रु ग्णांच्या जीवाचा धोका टळला आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे, काही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसात नवीन पनवेलमध्ये तीन स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळले. पनवेल शहर आणि तालुक्यात एकूण सात ठिकाणी स्किनिंग सेंटर आहेत त्याचबरोबर कामोठे एमजीएम येथे स्वतंत्र कक्ष सेवा सुरू करण्यात आली आहे.
टॅमी फ्लू, अ‍ॅमी फ्लूच्या गोळ्यांनी उपचार केला जाऊ शकतो. मात्र स्वाईनची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचारकरीता दवाखान्यात जावे असे आवाहन ग्रामीण रूग्णालयाकडून करण्यात आले आहे.आरोग्य विभागाने पनवेल परिसरातील शाळांमध्ये जनजागृती अभियान राबवले आहे. शाळांमध्ये स्वाईन फ्लूबाबत तज्ज्ञाच्या मार्फत प्रबोधन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बॅनर्स होर्डिग्ज लावण्यात आले आहेत.
पनवेल नगरपालिका, सिडको आणि मिटकॉनच्या माध्यमातून पत्रकही वाटण्यात आले आहेत. नवीन पनवेल परिसरात गेल्या काही दिवसात तेवीस रुग्ण आढळले असून त्यापैकी काही जण बरे झाले आहेत, तर
काहींर उपचार सुरू आहेत.
(वार्ताहर)
डोअर टू डोअर सर्वेक्षण
पनवेल परिसरात फ्लूचे रु ग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिका आणि ग्रामीण रूग्णलायच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. स्वच्छता राखण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे
सध्या ताप, सर्दी, अंगदुखीच्या रु ग्णांमध्येही वाढ झाली आहे. सर्वच रु ग्णांना स्वाइन फ्लू असेल असे नाही. व्हायरल इन्फेक्शनही असते. मात्र, आम्ही दक्षता घेत आहोत. स्वाइन फ्लू कक्ष कार्यान्वित केला आहे. तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही उपलब्ध आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
- डॉ. बी.एस लोहारे,
वैद्यकीय अधीक्षक, पनवेल ग्रांमीण रुग्णालय

Web Title: Swine Flu is spreading in Panvel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.