स्वप्निलचा मोबाइल पोलिसांना सापडला
By Admin | Updated: July 24, 2016 04:04 IST2016-07-24T04:04:40+5:302016-07-24T04:04:40+5:30
प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या स्वप्निल सोनवणेचा मोबाइल पोलीसांच्या हाती लागला आहे. या मोबाइलच्या माध्यमातून पोलिसांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे सुगावे हाती लागण्याची

स्वप्निलचा मोबाइल पोलिसांना सापडला
नवी मुंबई : प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या स्वप्निल सोनवणेचा मोबाइल पोलीसांच्या हाती लागला आहे. या मोबाइलच्या माध्यमातून पोलिसांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे सुगावे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. अटक केलेल्या एका आरोपीकडून पोलिसांनी हा मोबाइल जप्त केला आहे.
नेरूळ येथे राहणाऱ्या स्वप्निल सोनवणे याची मंगळवारी रात्री आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली होती. त्याचे ज्या मुलीसोबत प्रेम होते त्या मुलीच्या भावाने स्वप्निलला मारहाण करतेवेळी त्याच्याकडून हा मोबाइल हिसकावून घेतला होता. या मोबाइलमध्ये त्यांच्या दोघांची छायाचित्रे तसेच काही व्हिडीओ होते. दोघांच्या एकत्रित सहवासाचे हे पुरावे नष्ट करून स्वप्निल तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता, असे भासविण्याचा मुलीच्या नातेवाइकांचा प्रयत्न असावा, त्या उद्देशाने मोबाइल मिळणे महत्त्वाचे होते. (प्रतिनिधी)