पळसच्या सरपंचपद निवडणुकीला स्थगिती

By Admin | Updated: November 27, 2014 22:31 IST2014-11-27T22:31:41+5:302014-11-27T22:31:41+5:30

दत्ताराम डाकी यांनी आपला ओ. बी. सी. चा दाखला अर्जासोबत न जोडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी घेण्यात आलेली निवडणूक रद्द केली आणि या निवडणुकीला स्थगिती दिली आहे.

Suspension of Sarpanchad election in Palas | पळसच्या सरपंचपद निवडणुकीला स्थगिती

पळसच्या सरपंचपद निवडणुकीला स्थगिती

नागोठणो : विभागातील पळस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आज घेण्यात आलेली निवडणूक सरपंचपदाचे उमेदवार दत्ताराम डाकी यांनी आपला ओ. बी. सी. चा दाखला अर्जासोबत न जोडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी घेण्यात आलेली निवडणूक रद्द केली आणि या निवडणुकीला स्थगिती दिली आहे.
शासनाच्या नवीन नियमाप्रमाणो डाकी आज अधिकृतरीत्या सरपंचपदी विराजमान झाले नसले, तरी कागदपत्नांची लवकरात लवकर पूर्तता करून शासनाकडून पुन्हा निवडणूक घेण्यात येईल व तेव्हा दत्ताराम डाकीच आमचे उमेदवार असतील, असे राष्ट्रवादीचे नेते तथा मार्गदर्शक शिवराम शिंदे यांनी सांगितले.
विभागात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणा:या  ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. अंतर्गत तडजोडीनुसार दत्ताराम डाकी यांची शेवटच्या वर्षासाठी सरपंच पदावर नेमणूक करावयाची असल्याने किसन बोरकर यांनी अलीकडे  सरपंचपदाचा राजीनामा देवून डाकी यांचा मार्ग मोकळा केल्याने आज शासनाकडून सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान सरपंचपदासाठी डाकी यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित समजण्यात आली होती. 
 
4 सरपंचपदासाठी डाकी यांचे नाव अधिकृतरीत्या जाहीर केले जाईल असे अपेक्षित असताना ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओ. बी. सी.) यासाठीच राखीव असून डाकी यांनी अधिकृत जातीचे प्रमाणपत्न जोडले नसल्याच्या नियमावर निर्देश करीत निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले.   
4शासनाच्या जानेवारीत काढलेल्या आदेशानुसार उमेदवाराकडे जातीचे अधिकृत प्रमाणपत्न असणो अनिवार्य आहे. डाकी यांच्याकडे संबंधित प्रमाणपत्न उपलब्ध नसल्यामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली. 

 

Web Title: Suspension of Sarpanchad election in Palas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.