पनवेल पालिकेच्या भूमापक अधिकाऱ्याचे निलंबन

By Admin | Updated: January 11, 2017 04:34 IST2017-01-11T04:34:59+5:302017-01-11T04:34:59+5:30

पनवेल महापालिकेतील बांधकाम विभागात भूमापक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रदीप बाळकृष्ण गावडे यांचे मंगळवारी पालिका आयुक्त

Suspension of Land Officer of Panvel Municipal | पनवेल पालिकेच्या भूमापक अधिकाऱ्याचे निलंबन

पनवेल पालिकेच्या भूमापक अधिकाऱ्याचे निलंबन

पनवेल : पनवेल महापालिकेतील बांधकाम विभागात भूमापक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रदीप बाळकृष्ण गावडे यांचे मंगळवारी पालिका आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांनी  निलंबन केले. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.  महापालिकेत बांधकाम पर्यवेक्षक म्हणून निशांत औसरमल हे मागील तीन महिन्यांपासून कार्यरत आहेत. अतिक्र मण कारवाईसाठी महापालिकेने ठेका पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. पालिका हद्दीतील अतिक्र मण हटविण्याच्या कामासंदर्भात गावडे यांना शनिवारी कार्यालयीन कामाचे आदेश देण्यात आले होते.
वरिष्ठाच्या आदेशाला न जुमानता गावडे यांनी सुटीच्या दिवशी काम करणार नाही, तसेच सोपवलेले काम हे नगररचना विभागाशी
निगडित असल्याचे सांगत काम करण्यास नकार दिल्यामुळे  वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी व कामात
हलगर्जी, बेजबाबदारपणा दाखविण्याप्रकरणी ही  कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspension of Land Officer of Panvel Municipal