शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 23:55 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड : जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, सरकारी रुग्णालयातील काही डॉक्टर रुग्णांना खासगी औषध दुकानातून औषधे आणण्यास सांगत आहेत. अशा डॉक्टरांना त्वरित निलंबित करा, असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा घेतला. त्यानंतर, झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयांमधील बेडची क्षमता संपली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांना संबंधित डॉक्टरांकडून खासगी औषधांच्या दुकानातून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. किमान तीन हजार रुपयांपर्यंतचा किंबहुना त्यापेक्षा अधिक आर्थिक भुर्दंड संबंधित रुग्णाला सोसावा लागत आहे, परंतु सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधांचा साठा शिल्लक असताना रुग्णांना नाहक त्रास दिला जात असल्याने, रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री तटकरे यांनी घेतली.खासगी औषध दुकानामधून औषधे आणण्याचा आग्रह धरणाºया संबंधित डॉक्टरांना तातडीने निलंबित करा, असे आदेश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना दिले.याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आदी अधिकारी उपस्थित होते.तीन बेड सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी : प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन बेड सौम्य लक्षणे असणाºया रु ग्णांसाठी जिल्ह्यातील आॅक्सिजन आणि आयसीयू बेडची क्षमता वाढवण्यात येत आहे. वाढणारा आकडा लक्षात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान तीन बेड हे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाºयांसाठी आरक्षित करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.‘आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा’माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. पुढील कालावधीत रुग्ण वाढण्याचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकार, प्रशासनाची आहे. मात्र, कोणतेही दुखण अंगावर काढू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच उपचार घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस