शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वंशाच्या दिव्यापेक्षा मुली बऱ्या, सुप्रिया सुळे यांचा वक्तव्याने उलटसुलट चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 12:36 IST

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेते आपल्या वारसांसह पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा आणि शिवसेनेची वाट धरत आहेत.

नवी मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेते आपल्या वारसांसह पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा आणि शिवसेनेची वाट धरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली आहे. नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी 'वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे उलट सुलट चर्चांना जोर आला आहे. आज नवी मुंबईत आलेल्या सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडून चाललेली नेतेमंडळी आणि भाजपावर जोरदार टीका केली. 'वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या', असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा रोख सध्या भाजपाच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील बडे नेते गणेश नाईक आणि त्यांच्या पुत्राकडे असल्याची चर्चा आहे.यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग करवून घेत असलेल्या भाजपावरही सुप्रिया सुळे यांनी टीका केली. कॉंग्रेस मुक्त भारत करणारा भाजपा आता पक्षात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देत आहे. त्यामुळे भाजप हा कॉंग्रेस युक्त पक्ष झाला आहे. भाजपने पक्षाचे नाव बदलून कॉंग्रेस जनता पार्टी करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.  दरम्यान, मागील 40-40 वर्षे एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. परंतु, जात असतांना दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागतो, ही अतिशय दुर्देवाची गोष्ट असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यात केली होती.  आम्ही वंशाच्या दिवा नसलो तरी आम्ही स्वाभिमानी असून आम्ही आमच्या वडिलांना आमच्या स्वार्थासाठी कुणापुढेही मुजरा करायला लावत नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीतून भाजप व शिवसेनेत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांना टोला लगावला होता.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा