नरेगाच्या ५० टक्के मजुरांची आधार नोंदणी

By Admin | Updated: September 3, 2015 02:54 IST2015-09-03T02:54:31+5:302015-09-03T02:54:31+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकून त्यांच्या नावासमोर आधार क्र मांक जोडणीस सुरु वात केली आहे

Support for 50% of NREGA workers | नरेगाच्या ५० टक्के मजुरांची आधार नोंदणी

नरेगाच्या ५० टक्के मजुरांची आधार नोंदणी

पंकज रोडेकर, ठाणे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकून त्यांच्या नावासमोर आधार क्र मांक जोडणीस सुरु वात केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सुमारे ५० टक्के मजुरांची आधार नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये पालघरात १ लाख ७ हजार ५८९, तर ठाणे जिल्ह्यात ३० हजार ३१५ मजूर कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वाधिक नोंदणीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, तर पालघरमधील वाडा तालुका आघाडीवर आहे. उर्वरित मजुरांचीही नोंदणी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नोंदणी केली, पण आधार क्र मांक मिळाला नसल्यास ई-आधारची तपासणी करावी. एखाद्या मजुराचे कायमस्वरूपी स्थलांतर झाले असल्यास आणि एखादा मजूर मयत झाला असल्यास त्याची माहिती नष्ट करावी, अशा स्वरूपात पडताळणी करण्याचे सुचविले आहे. तसेच मजुराची वैध कारणांमुळे द्विरु क्ती झालेल्या व बनावट नोंदणीची दुरु स्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

आधार क्र मांक जोडलेल्या मजुरांपैकी ३३ हजार ६०० मजुरांची टपाल कार्यालयातदेखील नोंदणी झाली आहे. या आकडेवारीवरून दोन्ही जिल्ह्यांतील ४८.७९ टक्के मजुरांची नोंदणी झाली असून उर्वरित नोंदणीसाठी प्रत्येक मजुराने आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन
संबंधित विभागाने केले आहे.

ठाणे-पालघर या दोन्ही जिल्ह्यांत नरेगांतर्गत कार्यरत असलेल्या मजुरांची संख्या एकूण एक लाख ३७ हजार ९०४ इतकी आहे. त्यापैकी ६७ हजार २९० मजूर आधार क्र मांकांशी जोडले गेले आहेत. तर, ७० हजार ६१४ मजूर आधार क्रमांकांशी अद्यापही जोडले गेले नाहीत.

Web Title: Support for 50% of NREGA workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.