शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या हत्येसाठी सुक्खा देणार होता शस्त्र; पनवेल पोलिसांनी पानिपतमधून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:40 IST

सहा महिन्यांपूर्वी सलमान खानच्या फार्म हाऊसच्या रेकीप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांच्या माहितीत त्याचे नाव पुढे आले होते...

नवी मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या हत्येसाठी हत्यार पुरवणार असल्याच्या संशयातून पानिपतमधून सुक्खा ऊर्फ सुखबीर याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याठिकाणी तो हॉटेलमध्ये वास्तव्याला असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी हरयाणा पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. सहा महिन्यांपूर्वी सलमान खानच्या फार्म हाऊसच्या रेकीप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांच्या माहितीत त्याचे नाव पुढे आले होते.

अभिनेता सलमान खान याच्या पनवेलमधील फार्म हाऊसच्या रेकीप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी पाचजणांना अटक केली होती. यावेळी लॉरेन्स बिष्णाेई टोळीकडून सलमान खानच्या हत्येचा कट रचला जात असल्याची बाब उघड झाली होती. त्यातूनच ५० ते ६० जणांनी सलमानच्या फार्म हाऊसची रेकी केली होती, तर अटक केलेल्या पाचजणांच्या चौकशीत त्यांना सलमानची हत्या करण्यासाठी सुक्खा ऊर्फ सुखबीर हा हत्यार पुरवणार होता, अशी माहिती उघड झाली होती. त्यावरून पनवेल शहर पोलिस मागील सहा महिन्यांपासून सुखबीरच्या मागावर होते. अखेर दोन दिवसांपूर्वी तो पानिपत येथील हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पनवेल शहर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन हरयाणा पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.

पाकिस्तान कनेक्शन उघड होणारसुखबीर याचे लॉरेन्स बिष्नोई टोळीशी संबंध असून, तो पाकिस्तानमधील काही व्यक्तींशी संबंध असल्याचीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे सुखबीरच्या अटकेने चौकशीत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Salman Khanसलमान खानbollywoodबॉलिवूड