नवी मुंबईच्या महापौरपदी सुधाकर सोनावणे
By Admin | Updated: May 10, 2015 05:41 IST2015-05-10T03:48:23+5:302015-05-10T05:41:43+5:30
वी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँगे्रस - राष्ट्रवादी आघाडीचे रबाले येथील नगरसेवक सुधाकर संभाजी सोनावणे यांची

नवी मुंबईच्या महापौरपदी सुधाकर सोनावणे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँगे्रस - राष्ट्रवादी आघाडीचे रबाले येथील नगरसेवक सुधाकर संभाजी सोनावणे यांची तर उपमहापौरपदी काँगे्रसचे अविनाश शांताराम लाड यांची निवड झाली.
त्यांनी अनुक्रमे शिवसेनेचे संजू आधार वाडे आणि भाजपाच्या उज्ज्वला विकास झंझाड यांचा प्रत्येकी २३ मतांनी पराभव केला. सोनावणे आणि लाड यांना प्रत्येकी ६७ तर वाडे आणि झंझाड यांना प्रत्येकी ४४ मते मिळाली. या निवडणुकीत अपक्षांसह राष्ट्रवादीची मते फोडून चमत्कार घडविण्याची भाषा शिवसेनेने केली होती. मात्र एकही मत फोडता न आल्याने त्यांच्या चमत्काराचा फुगा फुटला. गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आपण नवी मुंबईचे किंगमेकर असल्याचे दाखवून दिले.